अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या बिपरजॉय वादळाचा अनुकूल परिणाम मान्सूनच्या प्रवासावर होणार आहे.
बिपरजॉय वादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
देशात अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णता वाढली आहे तर काही भागांमध्ये मान्सूनमुळे पाऊस पाहायला मिळत आहे. केरळसह आता कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांतील काही भागांमध्येदेखील मान्सून पुढे सरकरण्याची शक्यता आहे.
तसेच याचा परिणाम शेजारच्या राज्यांमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. तसेच बिपरजॉय वादळाची तिव्रता देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छीमारांना समुद्रान न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग १५० किमी प्रति तास इतका वाढू शकतो.
हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, येत्या ५ दिवसांत आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप येथे देखील पाऊस पडेल.
आयएमडीने सांगितले की, झारखंड आणि ओडिसा येथे ११ ते १३ जून दरम्यान भीषण उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये १२ जून पोजी तापमान वाढेल. बिहार आणि आंध्र प्रदेशचा किनारपट्टीलगतच्या भागाला देखील १२ जून पर्यंत भीषण गरमीचा सामना करावा लागू शकतो. मात्र यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
बिपरजॉय वादळामुळे कुठे पडेल पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय मुळे पुढील आठवड्यात राजस्थानच्या काही भागात पाऊस पडू शकतो. जयपूरच्या हमामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या अती भीषण वादळ हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. १६ जूनला हे वादळ पाकिस्तानच्या किनाऱ्यावर धडकण्याची दाट शक्यता आहे. यानुसार १४-१४ जूनला राजस्थानच्या दक्षिण आणि पश्चिम भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये १०-१२ जून पर्यंत तर लक्षद्वीपमध्ये १० ते ११ जून रोजी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी केरळ आणि लक्षद्वीप येथे पाऊस झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.