Bipin Rawat sakal
देश

पाक-चीनला धडकी भरवणारी CDS बिपीन रावत यांची वक्तव्ये

तालिबानसंदर्भात रावत यांनी केलं होते धाडसी वक्तव्य

सुशांत जाधव

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाले. देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करताना त्यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली. त्यांची विधाने ही पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारी असायची. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेकदा जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांनी पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचा थेट आरोप केला होता. तीन दशकापासून पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा यांनी एकत्रितपणे जम्मू-काश्मीरमध्ये 'प्रॉक्सी वॉर' छेडले आहे, असे ते म्हणाले होते. पाकिस्तान सोशल मीडियाचा आधार घेत एंटी-इंडिया असा अपप्रचार करुन भारतात धार्मिक दंगल घडवून आणण्याचा डाव आखत असल्याची थेट टीकाही त्यांनी केली होती. जाणून घेऊयात बिपीन रावत यांची खास वक्तव्ये... (Bipin Rawat called out China Pakistan Top quotes)

सरदार पटेल यांच्यासंदर्भातील भाष्य

देशाचे पहिले संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. भारत आणि चीन यांच्यामध्ये ‘बफर देश’ (एक असा छोटा देश जो दोन शत्रू राष्ट्रांमधील संघर्ष कमी करण्याची भूमिकेत असतो) संकल्पना मांडली होती. यासंदर्भात पटेलांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना पत्रही लिहिले होते. 1950 च्या दशकात पटेलांच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी 1962 मध्ये चीनने देशाला हादरून सोडले, असे रोखठोक मत बिपीन रावत यांनी केले होते. याची चांगलीच चर्चाही झाली होती.

तालिबानसंदर्भात रावत यांनी केलं होते धाडसी वक्तव्य

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांनी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या थरारक संघर्षासंदर्भातही ठाम भूमिका मांडली होती. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येणार याची भारताला कल्पना आधीच होती. त्यासाठी 'कंन्टिजेन्सी-प्लॅन' तयार आहे. जर तालिबानी भारताच्या वाट्याला गेले तर दहशतवाद्यांना जसे उत्तर दिले जाते तसेच उत्तर त्यांनाही दिले जाईल, अशी धमकी वजा इशारा बिपिन रावत यांनी दिला होता.

2019 मध्ये पीओकेसंदर्भात रावत यांनी केलं होतं मोठं वक्तव्य

लष्कर प्रमुख असताना बिपिन रावत यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात मोठं वक्तव्य केले होते. ज्यावेळी आम्ही जम्मू काश्मीरच्या मुद्यावर विचार करतो त्यावेळी पीओके आणि गिलगिट बाल्तिस्तानचाही समावेश आहे, असे सांगत त्यांनी पाकिस्‍तानने भारताच्या जाग्यावर कब्जा केल्याचा उल्लेख केला होता.

चीन सर्वात मोठा शत्रू

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानपेक्षा चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे विधान केले होते. बिपिन रावत यांनी टाइम्स नाउ समिटमधील कार्यक्रमात चीनवर निशाणा साधला होता.

काश्मीरसंदर्भातील वक्तव्य

नवी दिल्लीतील रायसीना डायलॉग 2020 या कार्यक्रमात बिपिन रावत यांनी काश्मीरमधील लहान मुलांसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. 10 -12 वर्षांच्या मुलांना कट्टरपंथीय बनवले जात आहे, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: रोहित पाटील-संजयकाका पाटील एकाच वेळी आले समोरासमोर

Nashik News : ‘घाबरू नको बाळा, मतदान होईपर्यंत मला काहीच होणार नाही’; आईच्या निधनानंतर 24 तासांत नायब तहसीलदार पुन्हा कर्तव्यावर

Sameer Bhujbal vs Suhas Kande: तुझा मर्डर आज फिक्स...सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT