Rajasthan Rain sakal
देश

Biporjoy Cyclone : राजस्थानाला पावसाने झोडपले; ‘बिपोरजॉय'चा उत्तर गुजरात, ईशान्य भारत, तमिळनाडूला तडाखा

बिपोरजॉय चक्रीवादळामुळे सलग तिसऱ्या दिवशी राजस्थानातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

पीटीआय

जयपूर - बिपोरजॉय चक्रीवादळामुळे सलग तिसऱ्या दिवशी राजस्थानातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जयपूरच्या हवामान केंद्राने सवाई माधोपूर, बुंदी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून रेड ॲलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी कोटा, करौली, बारा, भिलवाडा आणि टोंक शहरासाठी ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. गेल्या चोवीस तासांत अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ३०० मिलिमीटर म्हणजे १२ इंच पाऊस नोंदला गेला आहे.

राजस्थानातील जालौर, बाडमेर आणि सिरोही येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पावसाचे सात जण मृत्युमुखी पडले आहेत. जयपूरच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी बिपोरजॉयचा परिणाम भरतपूर, कोटा विभागात दिसू शकतो. चक्रीवादळ आणखी कमकुवत होऊन त्याचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. चक्रीवादळ अजूनही १० किलोमीटर प्रति तास वेगाने ईशान्य भारताकडे जात असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

चक्रीवादळामुळे जालौरला सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ३६ तासांत ४५६ मिलिमीटर म्हणजे १८ इंच पावसाची नोंद झाली आहे. याप्रमाणे आहोर(जालौर) येथे ४७१ मिलीमीटर, भीमनाल येथे २१७ मिलिमीटर, राणीवाडा येथे ३२२ मिलिमीटर, चितलवाना येथे ३३८ मिलिमीटर, सांचोर येथे २९६, जसवंतपुरा येथे ३३२, सायला येथे ४११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे जालौरची स्थिती ढासळली आहे.

हजारो नागरिकांना ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. पाली आणि जालौर जिल्ह्यातील पूरजन्य भागात अडकलेल्या ३० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अजमेरचे जिल्हा रुग्णालय जलमय झाले आहे.

गंगटोक येथे शंभर घराची पडझड

ईशान्येकडील भागातही बिपोरजॉयचा परिणाम पाहावयास मिळत आहे. सिक्कीमच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहा:कार उडाला आहे. पावसामुळे रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील पायाभूत सुविधा आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे पश्‍चिम सिक्कीम जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक घरांची पडझड झाली आहे.

एक मोठा पूल देखील वाहून गेला आहे. पर्वतीय भागातील कॉलेज खोला खोऱ्यात अचानक मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिम्फोक येथे बसला आणि एक मोठा पूल वाहून गेला. ग्यालशिंग जिल्ह्यातील अंतर्गत डेटेम उपविभगात भूस्खलन झाले असून तेथील घरांची आणि रस्त्याची हानी झाली आहे. पुरामुळे शेतजमिनीची हानी झाली आहे.

उत्तर गुजरातला पावसाचा तडाखा

अहमदाबाद: गेल्या चोवीस तासांत उत्तर गुजरातला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बिपोरजोय वादळ ओसरले असले तरी पावसामुळे बनासकांठा जिल्ह्यातील अनेक गावांत पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागात येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. बनासकांठा जिल्ह्यातील धानेरा तालुक्यात असंख्य गावांत पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. जडिया गावात २२ गायी वाहून गेल्या आहेत.

धानेरा येथे स्थानिक प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य सुरू आहे. बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यात १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर अमीरगड, खेडब्रह्मा, विजनगर, पोशिना, वाडाली येथे पावसाने हजेरी लावली आहे.

तमिळनाडूला पावसाचा फटका

मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील अनेक शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चेन्नईच्या चेंगलपट्टू, कांचीपूरम, वेल्लोर, राणीपेट आणि तिरुवलूर जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. पावसामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर चेन्नईकरांना आता पावसाचा फटका सहन करावा लागत आहे.

१८ जून रोजी मुसळधार पावसामुळे चेन्नईला जाणाऱ्या सहापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळविण्यात आले. त्यामुळे डझनभर विमानांचे उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडले. दोहा आणि दुबईहून येणारी सुमारे १० उड्डाणे बंगळूरकडे वळविण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळित झाली.

चेन्नईच्या मीनाबक्कम येथे सोमवारी पहाटे ५.३० पर्यंत १३.७ सेंटीमीटरच्या पावसाची नोंद झाली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. चेन्नईच्या अनेक जिल्ह्यात २१ जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाकडून जारी केलेल्या अंदाजात कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवन्नलाई, कल्लाकुरिची, विल्लुपुरम, कुड्डालोर, माईलादुथुराई, नागाट्टिनम, तिरुवरुर, तंजावर, त्रिची, अरियालूर, पेरम्बलूरसह १३ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT