Calcutta High Court On Birbhum Violence esakal
देश

बिरभूम घटनेची कलकत्ता उच्च न्यायालयाने घेतली दखल, आज घेणार सुनावणी

पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या हिंसेत आठ लोकांना जिवंत जाळल्याची घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) बिरभूम जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) झालेल्या हिंसेत आठ लोक जिवंत जाळली गेल्याची घटना घडली. या घटने प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) स्वतःहून जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आज बुधवारी (ता.२३) याबाबत सुनावणी घेणार असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले. तृणमूल काँग्रेसचे (TMC) उपसरपंच भडू शेख यांची बोगतू गावात सोमवारी (ता.२१) हत्या करण्यात आली. यानंतर रामपूरहट येथे हिंसेची (Birbhum Violence) घटना घडली. येथे संतापलेल्या जमावाने आठ घरे पेटवून दिली. यात आठ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. (Birbhum Violence Calcutta High Court Suo Motu Congnizance)

कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी या घटनेबाबत याचिका दाखल करण्यात आली असून त्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग किंवा राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, असे वृत्त 'लाईव्ह लाॅ' ने दिले आहे. बुधवारी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, की हिंसा घडवून आणलेल्या लोकांना सोडले जाणार नाही. या प्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले.

मात्र भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. या घटनेचा विरोध करत विधानसभा अधिवेशन सत्रावर भाजपने बहिष्कार टाकला. भाजपच्या आमदारांचे शिष्टामंडळ सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज घटनास्थळाला भेट देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT