rajiv gandhi 
देश

"राजीव गांधी मॉब लिचिंगचे 'पितामह'"; भाजपचा राहुल गांधींवर पलटवार

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भाजपनं निशाणा साधला

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मॉब लिंचिंग (Mob Lynching) अर्थात जमावाकडून मारहाणप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (राहुल गांधी) यांनी केलेल्या ट्विटनंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (amti malviy) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. राहुल गांधींचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यावर निशाणा साधताना "राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे पितामह आहेत," असा आरोप त्यांनी केला आहे. (BJP Amit Malviya calls Rajiv Gandhi father of mob lynching after Rahul Gandhi tweet)

दिवसाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं होतं, "सन २०१४ पूर्वी 'लिचिंग' हा शब्द कधी ऐकायलाही मिळत नव्हता" या ट्विटला यापुढे त्यांनी थँक्यू मोदीजी असा हॅशटॅगही वापरला होता. या ट्विटला उत्तर देताना मालवीय यांनीही एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी सन २०१४ पूर्वी देशातील विविध भागांमध्ये झालेल्या हिंसाचाराची वर्षनिहाय माहिती दिली.

मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "अहमदाबाद (१९६९), जळगाव (१०७०), मोरादाबाद (१९८०), नेली (१९८३), भिवंडी (१९८४), दिल्ली (१९८४), अहमदाबाद (१९८५), भागलपूर (१९८९), हैदराबाद (१९९०), कानपूर (१९९२), मुंबई (१९९३)....ही छोटीच यादी आहे. नेहरु-गांधी परिवाराच्या निरिक्षणाखाली यामध्ये १०० लोकांचा जीव गेला आहे"

यानंतर मालवीय यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये हिंसाचारानतंर एका रॅलीला संबोधित करताना राजीव गांधी दिसत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हा हिंसाचार उसळला होता. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं की, "हे पाहा राजीव गांधींना जे मॉब लिचिंगचे पितामह आहेत" काँग्रेसनं रस्ते अडवले होते तसेच 'खून का बदला खून से लेंगे' अशी घोषणाबाजीही केली होती. महिलांवर बलात्कार, शीख पुरुषांच्या गळ्यात जळते टायर अडकवले होते, असा आरोपही त्यांनी या ट्विटमधून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT