Amit Shah esakal
देश

Amit Shah: अमित शाहांना 'स्टॉक मार्केट'बाबत केलेले वक्तव्य भोवणार! सेबी घेणार दखल? काय आहे प्रकरण?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका संपल्या असल्या तरी राजकीय घडामोडी अद्याप थांबलेल्या नाहीत. निवडणूक निकालापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून आज सेबीकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचे खासदार आज सेबीकडे सकाळी 11 वाजता तक्रार करणार आहेत. तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया गाडीच्या खासदारांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.

तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष यावेळी उपस्थित होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सेबीकडे याप्रकरणी तक्रार दाखल करून घेते का? आणि याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागेल.

अमित शाह काय म्हणाले होते?

स्टॉक मार्केट भूतकाळात देखील अनेकदा पडला आले. त्यामुळे स्टॉक मार्केटला निवडणुकांशी जोडणे योग्य नाही. काही अफवांमुळे मार्केट पडला असेल. पण, माझ्या मतानुसार, ४ जून आधी शेअर्स खरेदी करा. मार्केट चांगली कामगिरी करणार आहे, असं अमित शाह एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते.

अमित शाह पुढे म्हणाले की, ''जेव्हा केंद्रामध्ये स्थिर सरकार येतं, तेव्हा स्टॉक मार्केट चांगली कामगिरी करतं. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केट चांगली कामगिरी करेल.'' राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर स्टॉक मार्केटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी आता इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT