Madhavi Latha 
देश

Video: भाजपच्या उमेदवाराने मतदानकार्ड तपासण्यासाठी मुस्लीम महिलांना बुरखा हटवण्यास सांगितले; गुन्हा दाखल

कार्तिक पुजारी

हैदराबाद- हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुरखा घातलेल्या मुस्लीम महिला मतदारांना त्यांचे मतदानकार्ड मागून त्यांचे चेहरे तपासल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकपेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लता यांच्या विरोधात आयपीसीच्या 171C, 186, 505(1)(c) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता यांनी आझमपूर येथील बुथवर मतदारांचे मतदानकार्ड तपासले. सदर घटनेप्रकरणी व्हिडिओ समोर आल्यानंतर लता यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

लता यांनी सकाळी लवकर सिकंदराबाद येथील अम्रिता विद्यालयात जाऊन मतदान केलं. त्यानंतर त्या अझमपूर येथील पोलिंग बुथवर गेल्या, त्याठिकाणी त्यांनी मतदारांची तपासणी केली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, त्या गंभीरपणे मतदारांची तपासणी करत आहेत. बुरखा घालून मतदानासाठी आलेल्या काही महिला देखील त्याठिकाणी होत्या. लता यांनी त्यांना बुरखा हटवायला सांगून त्यांचे चेहरे आणि मतदारकार्डावरील फोटो एकच आहेत का, हे तपासलं.

उमेदवाराला अधिकार आहे का?

सदर प्रकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. एका उमेदवाराला पोलिंग बुथवर जाऊन लोकांचे मतदानकार्ड तपासण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मतदान केंद्राबाहेर कोणत्याही उमेदवाराला मतदारांचे मतदानकार्ड तपासण्याचा अधिकार नाही. हा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. मतदानकार्ड तपासण्याचा अधिकार फक्त मतदान केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे.

पोलिंग एजेंट किंवा पक्षाच्या उमेदवाराला मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे एखादा उमेदवार मतदानकार्ड किंवा ओळखपत्र दाखवण्यास सांगत असेल तर तुम्ही त्याला नकार देऊ शकता. दरम्यान, हैदराबादमधे माधवी लता विरुद्ध एआयएमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. ओवैसी हे हैदराबादमधून २००९ पासून सलग खासदार राहिलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT