bjp criticize congress rahul gandhi over statement on pm narendra modi politics esakal
देश

Rahul Gandhi : राहुलविरोधात हक्कभंग; पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे भाजप आक्रमक

चर्चा खर्गेंच्या स्कार्फची!

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसदेत पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर साधक-बाधक विचार केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अदानी समूहाशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे अस्वस्थ झालेल्या सत्ताधारी बाकांवरून हरकत घेण्यात आली होती.

कोणतीही नोटीस न देता आणि पुरावे न देता निराधार आरोप केले जात आहेत, असा आक्षेप कायदामंत्री किरण रिजिजू, खासदार निशिकांत दुबे, माजी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी घेतला होता. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा संदर्भ देत लोकसभेच्या नियम 353 आणि 369 चे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते.

अध्यक्षांची पूर्व परवानगी न घेता, स्वतःचा बचाव करण्यासाठी सदनात उपस्थित नसलेल्या व्यक्तीविरुद्ध आरोप करणे तसेच आरोप करताना त्याच्याशी निगडित दस्तावेज संसदेच्या पटलावर न मांडणे असे करून राहुल गांधींनी नियमभंग केल्याचे जोशी यांचे म्हणणे होते.

प्रस्ताव विचाराधीन

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आज राहुल गांधींविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला. बिर्ला यांनी यावर अध्ययनाअंती कार्यवाही होईल असे सांगितले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींविरोधातील हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पिठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी हा विषय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारचे वर्णन ‘सूट बूट की सरकार'' असे करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांचे राहणीमानही चर्चेचा विषय ठरते. गरीब कल्याण योजना, एका उद्योगपतीशी जवळीक यावरून सरकारला घेरणारे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण देताना जो लोकरीचा ‘स्कार्फ'' घातला होता तो ‘लुई व्हिटॉन'' या प्रसिद्ध कंपनीचा व ५७ हजार रुपयांचा असल्यावरून भाजप नेत्यांनी आता त्यांनाच घेरले आहे.

मोदी यांनी काल फेरवापर केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले जॅकेट घातले होते, जे चर्चेचा विषय ठरले होते. अधिवेशनात यापूर्वी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची ‘लुई व्हिटॉन''च्याच बॅगची व राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कडाक्याच्या थंडीतही घातलेला बर्बेरीचा टी शर्ट चर्चेचा विषय ठरले होते.

आता खर्गे यांचा लुई व्हिटॉन स्कार्फ चर्चेत आला आहे. काल मोदींच्या भाषणापूर्वी विरोधक अदानी प्रकरणावर गोंधळ घालत होते, त्याचवेळी गोयल यांनी खर्गे यांना चिमटा काढला. ते म्हणाले की, जेपीसी तपास वैयक्तिक बाबींमध्ये होऊ शकत नाही.

खर्गे यांनी स्कार्फ कुठून आणला, कोणी दिला आणि किंमत किती?'' गोयल यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. मोदींच्या जॅकेटचा संदर्भ देत भाजपचे शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की मोदींनी शाश्वत विकास आणि पर्यावरणाचा हिरवाईचा संदेश दिला तर खर्गे यांनी ५६ हजार ३३२ रुपयांचा महागडा लुई व्हिटॉन स्कार्फ घातला होता.

''स्वाद अपना अपना, संदेश अपना अपना... कोणीही फैसला करत नाही. कोणी लुई व्हिटॉन स्कार्फ किंवा बर्बेरी टी-शर्ट घातला आणि गरिबीबद्दल बोलले तरी काही हरकत नाही. ही ‘त्यांची‘ मानसिकता आहे.

बात निकलेगी तो....

खर्गे यांच्या स्कार्फच्या वादात चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी लुई व्हिटॉनचा स्कार्फ त्यांच्या ‘हृदया’च्या इतका जवळ घातला असेल तर काँग्रेसचे धोरणही एलव्ही (कंपनीला) धार्जिणे आहे असे मानायचे का? हीच बेगडी भांडवलशाही आहे का? बात निकलेगी तो दूर तलक जायेगी...असेही अग्निहोत्री यांनी म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT