मोदी कोणत्या विमानातून प्रवास करतात? ते एकटेच प्रवास करतात. ते एकटे का प्रवास करतात? भाजप नेते मूर्खासारखे बोलत आहेत.
बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या खासगी अलिशान जेट विमानातून केलेल्या दिल्ली (Jet Plane) प्रवासावर भाजपने जोरदार टीका केली आहे. ‘उद्देश दुष्काळ निवारण निधीचा नि प्रवास मात्र अलिशान जेटमधून’ अशी त्यांच्या दौऱ्याची खिल्ली उडविली आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या प्रवासावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या वृत्तीने हैराण झालो आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण निधी मागण्यासाठी पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याचा दावा केला असला तरी त्यांचा मुख्य उद्देश निगम आणि महामंडळांवर अध्यक्षांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा करणे हा होता. ते शेतकऱ्यांना मदत देऊ शकत नाहीत.
मात्र, आपल्या उच्चभ्रू जीवनशैलीचे ते प्रदर्शन करतात. दिल्ली ते बंगळूर दरम्यान अनेक विमान कंपन्यांची नियमित व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध असताना अलिशान जेट विमानातून प्रवास करणे योग्य नाही.’’ सिद्धरामय्या यांनी २० डिसेंबर रोजी तीन दिवसांचा दिल्ली दौरा संपवून बंगळूरला परतताना भाड्याने घेतलेले खासगी जेट विमान वापरले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा, गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू आणि कर्मचारी १४ आसनी खासगी जेट विमानामधून प्रवास करतानाचे फोटो व्हायरल झाले. भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी त्यांच्या ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट केला.
सिध्दरामय्या म्हणाले, ‘‘मला प्रथम सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास कसा करतात? कृपया भाजपवाल्यांना हा प्रश्न विचारा. मोदी कोणत्या विमानातून प्रवास करतात? ते एकटेच प्रवास करतात. ते एकटे का प्रवास करतात? भाजप नेते मूर्खासारखे बोलत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.