priyanka gandhi ANI
देश

Priyanka Gandhi News : प्रियंका गांधी अन् कमलनाथ यांच्यावर FIR दाखल, काय आहे कारण? वाचा

रोहित कणसे

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंदौर येथे काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यावरून प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते अरुण यादव अशा अनेक वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाउंट सांभाळणाऱ्या व्यक्तीविरोधात शनिवारी रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाकडून ग्वालियर येथे देखील एफआयआर दाखल करण्यात आली आ्हे. यापूर्वी एक दिवस आधीच भाजपकडून प्रियंका गांधी यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर दावा केला होता की, मध्य प्रदेशात ठेकेदारांच्या एका गटाने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात ५० टक्के कमिशन दिल्यावरच त्यांचं पेमेंट केलं जातं असा आरोप केल्याचा दावा केला होता. काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता की, कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमीशन वसूल करत होती. मध्य प्रदेश मधील भाजप सरकार भ्रष्टाचाराचे आपलेच रेकॉर्ड मोडीत काढलं आहे, कर्नाटकची जनता ४० टक्के कमिशन गेणारी सरकार सत्तेतून बाहेर झाली आता मध्य प्रदेशची जनत ५० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर करेल.

शनिवारी इंदौर येथील पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली की, भाजपचे नेते निमेश पाठक यांनी तक्रार केली आहे की, ज्ञानेंद्र अवस्थी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर बनावट पत्र व्हायरल केलं आहे. ज्यामध्ये ठेकेदारांकडून ५० टक्के कमिशन मागितले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवस्थी याच्यासोबत प्रियंका गांधी, कमलनाथ आणि अरुण यादव यांच्या ट्विटर अकाउंटच्या हँडलर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असू पुढील तपास सुरू आहे, यापूर्वी अतिरिक्त पोलिस उपायुक्त रामसनेही मिश्रा यांनी दावा केला आहे की संयोगितागंज पोलिस स्टेशनमध्ये ज्ञानेंद्र अवस्थी आणि इतरांसह संबंधीत ट्विटर हँडलवर दिलेल्या नावांच्या आधारावर प्रियंका गांधी, कमलनाथ आणि अरुण यादल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

एफआयआर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४६९ (प्रतिष्ठेला हानी पोहचवण्याच्या उद्देशाने फसवणूक) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाठक यांनी आरोप केला आहे की काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे खोटे आरोप आणि खोच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करुन राज्य सरकार आणि त्यांच्या पक्षाची बदनामी केली आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्तांनी सांगितलं की, पोलिस संबंधित ट्विटर हँडल्सच्या सत्यतेची तपासणी करत आहेत. एसपी राजेश सिंह चंदेल यांनी सांगितलं की, अक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट संबंधात ग्वालियर येथे एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपच्या जिल्हा कार्यसमिती सदस्य पंकज पालीवाल यांनी ग्वालियर पोलिसांत या खोट्या पत्राप्रकरणी ज्ञानेश अवस्थी आणि इतरांविरोधात गुन्हा नोदवला आहे. दरम्यान यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस वर सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT