BJp Govt Amit Shah Uniform Civil Code gujrat J P Nadda politics esakal
देश

Uniform Civil Code : ‘गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करणार’

भाजपचे सरकार समान नागरी कायदा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच व्यक्त केले

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर : भाजपचे सरकार समान नागरी कायदा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्याच धर्तीवर गुजरातमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यात समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्‍वास न पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या हस्ते शनिवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. ते म्हणाले,‘‘आमचा हा जाहीरनामा केवळ कागद नाही. भाजप सरकार जे सांगते ते करून दाखविते.

आम्ही घटनेनुसार कृती करतो.’’ यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे राज्य अध्यक्ष सी. आर. पाटील उपस्थित होते. काँग्रेसने आश्‍वासन दिल्यापेक्षा दुप्पट रोजगार देण्याची ग्वाही यात देण्यात आली आहे. काँग्रेसने पाच वर्षांत दहा लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे तर भाजपने आज २० लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले आहे. मुलींना बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत देणार असल्याचेही नड्डा यांनी सांगितले. तसेच विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक दुचाकीही मिळणार आहे.

गुजरातमध्ये ‘एम्स’

गुजरातमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) सारख्या संस्था उभारण्याचे वचन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Central Vidhan Sabha Election: महाविकास आघाडीत ‘मध्य’चा तिढा सुटला; वसंत गितेंना उमेदवारी, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू

Barack Obama : महात्मा गांधींना जगाचे नेते म्हणणाऱ्या बराक ओबामांना काँग्रेसचं निमंत्रण; काय आहे खास कारण?

Maharashtra Vidhansabha Nivadnuk: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मोठ्या नेत्यानं सांगितलं गणित; पाहा व्हिडिओ

Uddhav Thackeray: आर्थिक व्यवहाराने निष्ठेवर मात केली; कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT