काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात २० जागा जिंकण्यासाठी आतापासून रणनिती सुरु केली आहे.
बेळगाव : आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक (LokSabha Election) काँग्रेस (Congress) आणि भाजपने गांभीर्याने घेतल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.
दरम्यान, बेळगाव (Belgaum) लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून गोकाकचे आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी भाजपने यंदा वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले आहे.
भाजप हायकमांडने (BJP High Command) याबाबत रमेश जारकीहोळी यांना 'ऑफर' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियांका यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देणार असल्याबाबतत चर्चा सुरु आहे.
यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जारकीहोळी विरुद्ध जारकीहोळी असा सामना रंगणार का, हे पाहावे लागणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनीही आपले सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविल्याचीही चर्चा सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.
कोणत्याही परिस्थितीत राज्यात २० जागा जिंकण्यासाठी आतापासून रणनिती सुरु केली आहे. तर, विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात अपयश आलेल्या भाजपला आगामी लोकसभा निवडणूक कसोटीची ठरणार आहे. याचा विचार करून बेळगाव लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर जबाबदारी राहणार आहे.
राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याने बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपनेही या ठिकाणी तगडे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.