देश

बिहारमध्येही भाजप, जेडीयू दोन्ही पक्ष 'एकनाथ शिंदें'च्या शोधात : पासवान

सकाळ डिजिटल टीम

पाटना - महाराष्ट्रात मागील काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाजपने आज एकनाथ शिंदेच्या मदतीने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. मात्र महाराष्ट्रात भाजपने सत्तास्थापनेसाठी वापरलेला पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. हाच धागा पकडून लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी बिहारमधील भाजप आणि जनता दल युनायटेडला टोला लगावला. (BJP, JDU in search of 'their own Eknath Shinde says Chirag Paswan)

महाराष्ट्रातील घडामोडींचा दाखला देत चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये जनता दल युनायटेड (JDU) आणि त्यांचा मित्रपक्ष भाजप हे दोन्ही पक्ष "एकनाथ शिंदे" च्या शोधात आहे. जो की दुसऱ्या पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या पायाखालचा गालिचा काढू शकेल. बिहारमध्ये दोन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी युतीत असल्याचा आरोप करत वैचारिक मुद्दयावर नितीश कुमार यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याचं चिराग पासवान यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चिराग पासवान म्हणाले की, नितीश कुमार भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे साध्य करण्यासाठी एआयएमआयएमच्या चार आमदारांना नितीश कुमार यांनीच आरजेडीमध्ये पाठवल्याचा आरोपही पासवान यांनी केला. एआयएमआयएमचे आमदार जेडी(यू) च्या संपर्कात होते हे सर्वश्रूत आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या पक्षात जाण्याऐवजी ते आरजेडीमध्ये सामील झाले. या घडामोडीमागे कुमार यांचाच हात होता. त्याचं कारण म्हणजे, आता RJD बिहारमध्ये भाजपपेक्षा मोठा पक्ष ठरला असा दावाही पासवान यांनी केला.

हे दोन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र असून एकनाथ शिंदेंसारख्या माणसाच्या शोधात आहे. जेणेकरून प्रतिस्पर्ध्याचा पक्ष फोडता येईल, असही चिराग पासवान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT