Neeraja Reddy Esakal
देश

Neeraja Reddy: महामार्गावर टायर फुटून मोठा अपघात, भाजप नेत्या नीरजा रेड्डी यांचा मृत्यू

टायर फुटल्याने कार पलटी झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपच्या माजी आमदार आणि कुरनूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा काल रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

नीरजा रविवारी हैदराबादहून कर्नूलला येत असताना तेलंगणातील बीचुपल्ली येथे त्यांच्या कारचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 44 वर जोगुलांबा गढवाला जिल्ह्यातील इटिक्याला मंडळाच्या जिंकलापल्ली मंडळाजवळ झाला. या अपघातात अलुरू येथील नीरजा रेड्डी यांचा मृत्यू झाला. नीरजा रेड्डी हैदराबादहून कर्नूलला जात असताना टायर फुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली. या वेळी फॉर्च्युनर कार पलटी होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात नीरजा रेड्डी यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मकबा हाईट्समध्ये रात्री बैठक अन् माझ्या राजसाहेबांना फसवलं... वांद्रेत मोठी सेटलमेंट? मनसेत खळबळ माजवणारा गौप्यस्फोट

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा 'या' दिवशी होणार

Mahayuti: बंडोबांना थंड करण्यात महायुतीला येणार का यश? अन्यथा 'या' मतदारसंघात बसू शकतो फटका

Narak Chaturdashi 2024: 30 कि 31 ऑक्टोबर कधी आहे छोटी दिवाळी? काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

Mumbai Vidhansabha: मुंबई उपनगरात ३२४ उमेदवार मैदानात

SCROLL FOR NEXT