Kangana Ranaut 
देश

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Tejashwi Yadav reacts: व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय की, कंगना चुकून आपल्याच नेत्यावर टीका करत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अभिनेत्री आणि आता राजकारणाच्या रिंगणात उतरलेली कंगना रनौत हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय की, कंगना चुकून आपल्याच नेत्यावर टीका करत आहे. कंगना एका सभेत बोलत होती. यावेळी तिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे नाव घेण्याऐवजी तिने भाजप नेते तेजस्वी सूर्या यांचे नाव घेऊन टीका केली.

मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगना रनौत हिला मैदानात उतरवलं आहे. शनिवारी ती एका सभेला संबोधित करत होती. यावेळी ती म्हणाली की, 'तेजस्वी सूर्या नवरात्री दिवशी मच्छी खात आहे. ' विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, 'ही कोण महिला आहे?' त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

कंगनाने मंडीतील एका सभेत विरोधातील काही नेत्यांना लक्ष्य केलं. त्यामध्ये दक्षिण बंगळुरुचे भाजपचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांचे नाव तिच्याकडून चुकून घेण्यात आले. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नवरात्रीच्या दिवशी मच्छी खाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ९ एप्रिल रोजी तेजस्वी यादव यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवरुन भाजपने तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. याच मुद्द्यावरुन कंगना तेजस्वी यादव यांच्यावर टीका करु पाहात होती.

कंगनाने यावेळी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. देशात काही राजकूमार आहेत. राहुल गांधी यांना चंद्रावर बटाटे उगवायचे आहेत. अखिलेश यादव हे देखील काही बरगळत असतात असं ती म्हणाली. ज्यांना आपल्या देशाची भाषा समजत नाही, आपली संस्कृती समजत नाही ते देश कसे चालवणार, असंही ती म्हणाली आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघात १ जून रोजी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोगाची शिंदे गटाला नोटीस, खासगी वाहिन्यांवरील प्रचारावर आक्षेप; २४ तासात उत्तर मागवले

पैशांचा विषयच नव्हता...! Rishabh Pant ने दिल्ली कॅपिटल्सच्या निर्णयावर मौन सोडले; सुनील गावस्करांनाही अप्रत्यक्ष ऐकवलं

International men's day 2024 : भाऊ, बाबा, मित्रांना खास संदेश कोट्स आणि शायरीसह 'हॅपी मेन्स डे' साजरा करा.

Nashik Vidhan Sabha Election: नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा; जिल्ह्यात पंतप्रधान मोदी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मान्यवरांच्या सभा

बॉलिवूड सिनेमांपाठोपाठ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मराठी सिनेमाही अग्रेसर ; प्रदर्शनापूर्वीच गुलाबी सिनेमाची कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT