एका भाजप आमदारानं महिलेला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील (Karnataka) भाजपचे आमदार अरविंद लिंबावली (BJP MLA Arvind Limbavali) यांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बंगळुरुच्या वर्थुरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या समस्यांची लेखी तक्रार करण्यास गेलेल्या या महिलेसोबत भाजप (BJP) आमदारानं गैरवर्तन केलंय.
लिंबावली यांनी तुरुंगात डांबण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. ही महिला काँग्रेस कार्यकर्ता (Women Congress Worker) असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, भाजप आमदार लिंबावली हे महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडील कागद फाडताना दिसत आहेत. महादेवपुरा येथील भाजप आमदारापर्यंत काहीतरी सांगण्यासाठी ही महिला पोहोचली होती. मात्र, अरविंद लिंबावली तिच्यावर चिडले. त्या महिलेच्या हातात एक कागद होता आणि तो आमदाराला दाखवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आमदारानं तो हिसकावून फाडला. यानंतर त्यांनी पोलिसांना महिलेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
लिंबावली यांनी हातातील तक्रारींचे पत्र खेचून घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील या महिलेनं केलाय. “भाजपा आमदार अरविंद लिंबावली मला तुरुंगात डांबण्यास पोलिसांना वारंवार सांगत होते. जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर आमदारांसमोर उभे आहात. तुम्हाला आदर किंवा सन्मान आहे की नाही?” अशी प्रतारणा भाजपा आमदाराकडून करण्यात आल्याचा आरोपही या महिलेनं केलाय.
या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानं घ्यावी, अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार दिनेश गुंडू राव यांनी केलीय. यापूर्वी, भाजप आमदारानं आपल्या मुलीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करत पोलिसांशी गैरवर्तन केलं होतं. याप्रकरणी भाजप आमदारानं माफी मागितली होती. मात्र, आता याच आमदारानं एका महिलेसोबत गैरवर्तन केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.