khabbu tiwari esakal
देश

अयोध्येत भाजपला धक्का! खोट्या मार्कलिस्टवरून शिक्षण, आमदारकी रद्द

सकाळ डिजिटल टीम

अयोध्येत (ayodhya) भाजपला (bjp) मोठा धक्का बसला आहे. गोसाईगंज (gosaiganj) विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदाराचे विधानसभा सदस्यत्व (assembly membership) रद्द करण्यात आले आहे. याचे कारण आमदाराने चक्क खोटी मार्कशीट (fake marksheet) दाखवून पुढच्या वर्गात प्रवेश केल्याचं सांगण्यात येतंय. नेमका प्रकार काय?

बनावट मार्कशीटच्या आधारे पुढच्या वर्गात प्रवेश

1992 साली साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांनी इंद्र प्रताप तिवारी उर्फ ​​खब्बू, फूलचंद यादव आणि कृपा निधान तिवारी यांच्या विरोधात बनावट मार्कशीटच्या आधारे पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल 18 फेब्रुवारी 9219 रोजी रामजन्मभूमी पोलिस ठाण्यात एफआयआर लिहिला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर, तपासकर्त्याने सर्व लोकांविरुद्ध कलम 419, 420 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आरोपपत्र न्यायालयात सादर केले. कनिष्ठ न्यायालयाने हे प्रकरण 2018 मध्ये सुनावणीसाठी सत्राकडे पाठवले. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी खब्बू तिवारी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.

विधानसभा सदस्यत्व रद्द

फैजाबादच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी 18 ऑक्टोबर 2021 रोजी खटल्याची सुनावणी करताना खब्बू तिवारीला फसवणूक केल्याप्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 6,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अपहरण प्रकरणात तिवारीला पाच वर्षांचा कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये पाच जणांना कारावास आणि दंडाच्या शिक्षेमुळे विधानसभेच्या प्रधान सचिवांनी खब्बू तिवारी यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांचे पद रिक्त घोषित केले आहे. अयोध्या (ayodhya) जिल्ह्यातील गोसाईगंज (gosaiganj) विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार इंद्र प्रताप उर्फ ​​खब्बू तिवारी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 29 वर्षे जुन्या एका प्रकरणात पाच वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

खब्बू तिवारीचा गुन्हेगारी इतिहास आणि राजकीय प्रवास

इंद्र प्रताप तिवारी उर्फ ​​खब्बू तिवारी याच्यावर अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत, ज्यात अनेक गंभीर कलमांखालीही नोंद आहेत. त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 302,307, 308, 386, 323, 420, 467, 471, 504, 506, 147, 148, 149, 307, 120B इत्यादी कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT