भोपाळमधील दसरा मेळावा शुक्रवारी राजकारण्यांचा आखाडा बनला होता.
भोपाळमधील दसरा मेळावा शुक्रवारी राजकारण्यांचा आखाडा बनला होता. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी स्टेजवर उपस्थित असलेले कॉंग्रेस आमदार पी. सी. शर्मा (Congress MLA P. C. Sharma) यांची लाज काढत त्यांना शिव्या हासडल्या. मग काय, आमदार शर्मा रागाने लालबुंद होत, तत्काळ स्टेजवरुन खाली उतरले. शर्मा दसरा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून जात होते, तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबायला तयार नव्हते. संतापाच्या भरात ते निघून गेले.
भोपाळमध्ये अनेक ठिकाणी रावण दहन कार्यक्रम होत असतो. यावर्षी मोतीलाल नेहरू विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि आमदार पी. सी. शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यमक्रमाच्या भाषणादरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि काँग्रेस आमदारालाही शिव्या दिल्या, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. स्टेजवर उपस्थित असलेले कॉंग्रेस आमदार शर्मा यांनी खासदारांकडे रागाने बघ कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले.
खासदार प्रज्ञा सिंह यांनी, रावण दहन कार्यक्रमात काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी कमलनाथ यांचे नाव न घेता त्यांच्या आजारावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मला माहित आहे ते आजारी आहेत, म्हणूनच ते कोणाच्या आजारावर प्रश्न उपस्थित करत नाहीत. त्यामुळं त्यांनी माणुसकी आणि करुणा कधीही गमावू नये, असा टोला त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. साध्वींनी काँग्रेसला पशुसमान मानत म्हटलंय, की मूल मरण पावल्यावर प्राणीसुद्धा रडतात, पण हे लोक आजारी लोकांना आजारी मानत नाहीत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. खासदार प्रज्ञा सिंह इथेच थांबल्या नाहीत, तर आमदार शर्मा यांना शिव्या देत, ते आमदार पदाचे लायक नाहीत, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. केवळ ते हिंदू आहेत म्हणून आमदार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.