Rahul Gandhi esakal
देश

VIDEO : भाजप खासदारानं शेअर केला राहुल गांधींचा 'फेक' व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

भाजप सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन खोटी माहिती पसरवत आहे.

भाजप (BJP) खासदार राज्यवर्धन सिंह राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक फेक व्हिडिओ शेअर केलाय. यावर आता ट्विटरनं Stay Informed असं सांगत कारवाईचा बडगा उगारलाय.

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी एका खासगी वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, उदयपूर असो की वायनाड.. जेएनयूमध्ये 'अफजल आम्हाला लाज वाटते आणि भारत तेरे टुकडे होंगे' या गँगसोबत उभ्या असलेल्या काँग्रेसचं चरित्र तसंच आहे. जिहादी दहशतीच्या विषाचं बीज कोणी पेरलं, ते कोणी पाजलं, तुम्हीच विचार करा, असं त्यांनी नमूद केलंय.

खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित हा व्हिडिओ भाजपच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, काँग्रेस पक्षावर टीका केली जात आहे. मात्र, पक्षानं याचं स्पष्टीकरण दिलंय. भाजप असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन खोटी माहिती पसरवत आहे. याबाबत भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी माफी मागितली नाही, तर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसनं दिलाय.

खरं तर हे संपूर्ण प्रकरण एका वृत्तवाहिनीशी संबंधित आहे. वृत्तवाहिनीनं हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर चालवला होता. यामध्ये असा दावा केला होता की, राहुल गांधींनी उदयपूरच्या मारेकऱ्यांना 'बालक' म्हटलं आणि त्यांना सोडण्यास सांगितलं. काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलंय की, माजी अध्यक्षांनी वायनाडच्या संसदीय मतदारसंघातील राहुल गांधी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात टिप्पणी केली, जी वाहिनीनं उदयपूर घटनेशी जोडून सादर केली. मात्र, याबाबत वाहिनीनं खंत व्यक्त केलीय.

राहुल गांधी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलंय. 'फेक न्यूजच्या आधारे भाजप सरकार आपल्या 'गोदी मीडिया'सह राहुल गांधींना बदनाम करू इच्छित आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे लाखो प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. पण, प्रत्येक वेळी त्यांना तोंडावर पडावं लागलंय.' शुक्रवारी वायनाडमध्ये आलेल्या राहुल गांधींनी कलपेट्टा येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यर्त्यांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT