प्रतापगड (उत्तरप्रदेश) - अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज भाजपवर जोरदार टीका केली. या सोहळ्यासाठी दलित, आदिवासी आणि अगदी राष्ट्रपतींना देखील निमंत्रित करण्यात आले नव्हते, हा त्यांचा अवमान असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
‘रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक उद्योगपती आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्याला देखील निमंत्रित करण्यात आले होते. या माध्यमातून मोदींनी स्पष्ट संदेश दिला असून तो म्हणजे या देशातील ७३ टक्के जनतेला काहीही महत्त्व नाही,’ असे राहुल गांधी रामपूर खास विधानसभा मतदारसंघात लालगंज इंदिरा चौकातील भाषणात म्हणाले.
राहुल यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज येथे आगमन झाले. ‘भाजप सरकारने या देशातील ७३ टक्के दलित, मागास आणि आदिवासी यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले असून त्यांच्याऐवजी उद्योगपतींना प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे खिसे कापून केवळ उद्योगपतींचे खिसे भरत आहे. धर्माच्या नावाखाली देशात द्वेषच पसरविला जात आहे.
या देशातील तरुणांना रोजगार आणि महिलांना सुरक्षा पुरविण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’सारख्या संस्था या अक्षरशः खेळणे झाल्या असून विरोधकांना धमकावण्यासाठीच त्याचा वापर केला जात आहे,’ असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.