Bjp Politics 
देश

Bjp Politics: राष्ट्रवादीतील सर्जिकल स्ट्राईकनंतर BJPची पहिली चाल, सत्ता नसलेले राज्य ताब्यात घेण्यासाठी मोठे बदल

Sandip Kapde

Bjp Politics: महाराष्ट्रात गेल्या वेळी झालेल्या चुकांपासून धडा घेत भाजपने यावेळी अत्यंत शांतपणे आणि संयमाने 'ऑपरेशन लोटस' हाती घेतले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना आपल्या गोटात आणण्यासाठी गेल्या काही दिवसांत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या. भाजपला घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. अजित पवार दिल्लीत देखील जाऊन आले मात्र कुणाला भनक देखील लागली नाही.

अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि जे.के. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याची हीच योग्य वेळ आहे. राष्ट्रवादीतील सर्जिकल स्ट्राईक नंतर भाजप आता देशातील भाजपची सत्ता नसलेले राज्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

बिहारमध्ये ऑपरेशन लोटस करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बिहारमध्ये अनेक आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केंद्रातील मंत्र्यांनी केले आहे. भाजपचे कर्नाटकमध्ये देखील विशेष लक्ष आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सतर्क झाले आहे. भाजपने पहिली चाल चालली आहे. भाजपन 4 राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत.

पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि झारखंड चे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. वर्षाच्या शेवटी निवडणुका होणाऱ्या तेलंगणा राज्याची जबाबदारी किशन रेड्डी यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच सुनील जाखड यांच्यावर पंजाबची, आंध्र प्रदेशची जबाबदारी डी. पुरांदेश्वरी तर झारखंडची जबाबदारी बाबू लाल मराडी यांच्यावर देण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT