Rajya Sabha 
देश

BJP In Rajya Sabha: राज्यसभेतील भाजपची ताकद घटली! खासदारांची संख्या 86 वर; समीकरणात काय होणार बदल?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) यांची राज्यसभेतील ताकद कमी झाली आहे. खासदारांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी चार नामनिर्देशित सदस्य निवृत्त होत आहेत. हे चारही सदस्य भाजपच्या बाजूने राहिले आहेत. सध्या भाजपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ८६ आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची संख्या १०१ झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस राज्यसभेत मजबूत होताना दिसत आहे. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. खासदार राकेश सिन्हा, राम सकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे निवृत्त होत आहेत. राज्यसभेमध्ये सध्या एकूण २२६ खासदार आहेत आणि १९ जागा रिक्त आहेत.

काय होणार परिणाम?

येत्या बजेटमध्ये भाजपला अनेक विधेयकं मंजूर करून घ्यायचे आहेत. यासाठी भाजपला राज्यसभेतील ७ नामनिर्देशित सदस्य, २ अपक्ष, AIADMK आणि YSRCP पक्षाच्या खासदारांवर अबलंबून राहावं लागणार आहे. दुसऱ्यांवरचे अवलंबित्व कमी करणे आणि नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवणे यावर भाजपचा भर असणार आहे. या दृष्टीने भाजपने काम करणे गरजेचं बनलं आहे.

राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्य नामनिर्देशित करत असतात. सध्या राज्यसभेमध्ये ७ नामनिर्देशित सदस्य आहेत. नामनिर्देशित सदस्य पक्ष निरपेक्ष असतात असा समज आहे. याशिवाय राज्यसभेतील १९ जागा रिक्त आहेत. यात चार नामनिर्देशित, चार जम्मू-काश्मीरमधून, तसेच बिहार, आसाम, महाराष्ट्रातून प्रत्येकी दोन आणि हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरातून १-१ खासदारांचा समावेश आहे. यातील १० जागा गेल्या महिन्यात रिक्त झाल्या आहेत. कारण, काही खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत.

येत्या काळात ११ रिक्त जागांपैकी ८ जागा भाजपला मिळू शकतात. इंडिया आघाडीच्या पदरात ३ जागा पडू शकतात. तेलगंणातून काँग्रेसला एक जागा मिळू शकते. असं झाल्यास काँग्रेस राज्यसभेतील एकूण संख्याबळ २७ वर जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Pune to Bangkok flight: गुड न्यूज! पुण्यातून बँकॉक अन् दुबई विमानसेवेला मंजुरी; 'या' तारखेपासून होणार उड्डाण

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

IND vs BAN: विराट आऊट... रोहित नाराज; मात्र चेन्नईचे चाहते सुस्साट, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT