Odisha bjp 
देश

Odisha New CM: ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याची भाजप आज करणार घोषणा; कोण-कोणते नावे आहेत चर्चेत?

Odisha New CM names in discussion: ओडिशाच्या विधानसभेचा निकाल लोकसभा निकालासोबतच लागला होता. यात भाजपला १४७ जागांपैकी ७८ जागा मिळाल्या आहेत.

कार्तिक पुजारी

भुवनेश्वर- ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय झालाय. त्यानंतर आता राज्याला नवा मुख्यमंत्री देण्याची तयारी सुरू झाली आहे. माहितीनुसार, मंगळवारी नव्या मुख्यमंत्र्याबाबत घोषणा होऊ शकते. ओडिशाच्या विधानसभेचा निकाल लोकसभा निकालासोबतच लागला होता. यात भाजपला १४७ जागांपैकी ७८ जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी बीजू जनता दलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मंगळवारी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. बुधवारी नवे सरकार शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपचे ओडिशाचे प्रभारी विजय पाल सिंह तोमर यांनी सांगितलं की, पक्षाच्या आमदारांची आज मंगळवारी बैठक होईल, त्यानंतर १२ जून रोजी शपथविधी कार्यक्रम होईल. भाजपने या राज्यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांना पर्यवेक्षक केलं होतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणते नेते?

मिळालेल्या माहितीनुसार, बृजनगरचे आमदार सुरेश पुजारी, राज्यातील भाजप अध्यक्ष मनमोहन सामल, आमदार मोहन माझी आणि मुकेश महलिंग यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असे असले तरी भाजप मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान प्रमाणे वेगळ्या चेहऱ्याला संधी देऊन धक्कातंत्राचा वापर करू शकते. त्यामुळे कोणाच्याही नावाची घोषणा होऊ शकते. मात्र, दोन दिवसांपूर्वी सुरेश पुजारी हे दिल्लीत जाऊन भाजप वरिष्ठांशी बोलले होते. त्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी शक्यता आहे.

भाजपकडून राज्यात १२ जून रोजी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. जनता मैदानामध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे. दाव्यानुसार, शपथग्रहन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी देखील शपथग्रहन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षानंतर भाजपला ओडिशामध्ये भाजपला यश मिळवता आलं आहे. त्यामुळे भाजपकडून भव्य कार्यक्रम करण्याकडे कल दिसतोय. पंतप्रधान मोदी यांचा एक रोड-शो देखील करण्याचा विचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT