BJP Victory Rajasthan Madhya Pradesh Chhatishgarh PM Narendra Modi esakal
देश

BJP Victory 2023 Assembly Election : मोदींना 'पनौती' म्हणणं राहुल गांधींना महागात पडलं का?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती असं संबोधून त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना विधान सभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी फटकारले आहे.

युगंधर ताजणे

BJP Victory Rajasthan Madhya Pradesh Chhatishgarh PM Narendra Modi : विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये मतदारांनी बीजेपीच्या बाजूनं कौल दिला आहे. या राज्यांमध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. अशातच कॉग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परखड शब्दांत टीका केल्याचे दिसून येत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती असं संबोधून त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना विधान सभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी फटकारले आहे. देशाच्या पंतप्रधानांना अशा प्रकारे अपमानित करुन आपण काय साध्य केले अशा प्रश्न यावेळी समोर आला आहे. विधानसभा निवडणूकांपूर्वी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होत होत्या.

पनौती नावाचा ट्रेंड देखील सुरु होता. अशावेळी राहुल गांधी यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मोदी यांच्यावर केलेली टीका कित्येकांच्या चर्चेचा विषय होता. यावर भाजप नेता सीटी रवि यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ते म्हणाले की, आता बोला की कोण आहे पनौती, आणि त्यांनी ती पोस्ट राहुल गांधी यांना देखील टॅग केली आहे. सगळ्यात मोठी पनौती कोण आहे, काही आयडिया अशी पोस्ट रवि यांनी व्हायरल केली आहे.

रवि यांनी त्या ट्विटनंतर आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पराभव झाल्यानंतर कॉग्रेस आता कुठे जाणार, असा प्रश्न रवि यांनी विचारला आहे. निकालाच्या एक दिवस अगोदर प्रियंका खर्गे यांनी देखील सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी मोदींच्या ऐवजी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोटो दाखवला जात आहे असे म्हटले होते. त्याचाही समाचार रवि यांनी यावेळी घेतला.

या सगळ्या प्रकरणाविषयी सकाळच्या राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मोदीजी जे करतात त्याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराची भावना आहे. सर्व सामान्य नागरिकांमध्ये आनंद आहे. अशावेळी त्यांच्याविषयी कुणी पनौती सारखा शब्द वापरणे हा लोकांसाठी रागाचा, अनादराचा विषय होतो. काहीवेळेला त्या शब्दानं मोदींची लोकप्रियता आणखी वाढल्याचेही दिसून येते.

भाजपाच्या कार्यप्रणालीत पनौती म्हणणं बसत नाही. त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला. मोदींनी सर्वसामान्य लोकांसाठी ज्या सुविधा सुरु केल्या त्या लोकांच्या कौतुकाचा विषय आहेत. त्याचे काम चांगले आहे. त्यांचा प्रभावही चांगला आहे. जो व्यक्ती सातत्यानं काही चांगले करण्याचा प्रयत्न करतो आहे काही अंशी त्याला अपयशही आलं आहे पण त्याच्या प्रयत्नांना लोकांनी दाद दिली आहे. त्यामुळे त्यांना पनौती म्हणणं लोकांना आवडलं नाही. कॉग्रेसलाही त्याचा फटका बसला हे दिसून येते.

कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींना पराभूत केल्याशिवाय मतदार स्वस्थ बसणार नाहीत. आमच्या काही त्रुटी होत्या, त्यातून आता आम्हाला शिकायला मिळालं आहे. आज हरलो तरी उद्या जिंकणार, पनौती हा लोकांनी केलेला प्रचार आहे. काँग्रेसने दिलेला शब्द नाही.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पनौती या शब्दाचा वापर केला होता. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. यावेळी हा सामना हारल्यानंतर सोशल मीडियावर पनौती असा ट्रेंड सुरु झाला. भलेही आपले खेळाडु हरले असतील पण पनौतीनं आपल्याला हरवलं. या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगानं कॉग्रेसला त्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT