Bollywood actors 
देश

Election 2024: आतापर्यंत कोणते बॉलिवूड कलाकार आलेत राजकारणात, कशी राहिलीये त्यांची कारकीर्द? जाणून घ्या

Bollywood actors Careers in politics: सिनेजगतातील कोणते अभिनेते-अभिनेत्री राजकीय 'रंगमंचावर' यशस्वी-अयशस्वी ठरले हे पाहुया.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय राजकारणाने अनेक बॉलिवूड कलाकारांना आकर्षित केलं आहे. नुकतेच अभिनेता गोविंदा याने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गोविंदाला मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. २००४ मध्ये गोविंदाने लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. २००९ मध्ये त्याने राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. (Bollywood actors Careers in politics Who was a hit and who was a flop know history)

भाजपकडून यूपी-बिहारमधील अनेक कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. दक्षिणेतील अभिनेते राजकारणात येणे नवीन नाही. नुकतंच थलपती विजय राजकारणात सक्रिय झाला आहे. यापार्श्वभूमीवर सिनेजगतातील कोणते अभिनेते-अभिनेत्री राजकीय क्षेत्राशी जोडले गेले होते हे थोडक्यात पाहुया...

कंगना रनौत

भाजपकडून कंगना रनौत या अभिनेत्रीला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंगनाने भाजपच्या समर्थनात भूमिका घेतली होती. शिवाय तिने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे तिला तिकीट मिळेल अशी दाट शक्यता होती.

एमजी रामचंद्रन

तमिळ फिल्म इंडस्ट्रिमधील अभिनेत्यांनी राजकारणात येण्याचा जुना इतिहास आहे. दक्षिणेतील सुपरस्टार एमजी रामचंद्रन यांनी पहिल्यांदा राजकारणात एन्ट्री घेतल्याचं सांगितलं जातं. अभिनेता म्हणून त्यांचा डंका होताच, पण त्यांनी राजकारणात येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यांची राजकीय कारकीर्द राजकारणात दीर्घ राहिली.

एनटी रामाराम

एनटी रामाराम यांची देखील राजकीय कारकीर्द दीर्घ राहिली. त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. १९८२ मध्ये त्यांनी तेलुगु देसम पार्टीची स्थापना केली. आंध्र प्रदेशचे ते १० वे मुख्यमंत्री देखील झाले. १९८३ त १९९४ या काळात ते तीनवेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिली.

जयललिता

जयललिता हे नाव दक्षिणी राजकारणात प्रामुख्यान घेतलं जातं. १९७७ मध्ये तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणलं होतं. त्यानंतर जयललिता यांची कारकीर्द बहरतच गेली. त्या २४ जून १९९१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी सहावेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

रजनीकांत

दक्षिणेमध्ये अभिनेत्यांना देवासारखं पुजलं जातं. तमिळ सुपस्टार रजनीकांत यांनी २०१७ मध्ये राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. पक्षाची देखील स्थापना केली. पण, २६ दिवसातच बॅकआऊट केलं. २०२१ मध्ये पक्ष विसर्जित केला.

कमल हसन

कमल हसन यांनी २०१८ मध्ये मक्कल निधी मय्यम नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. सध्या ते राजकीय शक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी लोकसभेसाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पक्षासोबत हातमिळवणी केली आहे.

थलपती विजय

थलपती विजयने तमिझगा वेत्री कडगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विजयने प्रचार सुरु केला आहे. त्याला किती यश मिळतं हे पाहावं लागेल.

जया प्रदा

जया प्रदा यांनी एनटी रामाराम यांच्या तेलुगु देसम पक्षातून राजकीय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर सपा आणि २०१९ मध्ये त्या भाजपमध्ये आल्या आहेत. चिरंजीवी, साऊथ स्टार पवन कल्याण, सुरेश गोपी यांनी देखील राजकारणात हातपाय मारुन पाहिले आहेत.

महानायक अमिताभ बच्चन

अनेकांना माहिती नसेल पण महानायक अमिताभ बच्चन हे देखील काही काळ राजकारणात होते. राजीव गांधी यांच्या विनंतीवरुन त्यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली आणि ती जिंकली. पण, त्यावेळी ते चित्रपटांच्या शुटिंगमध्ये खूप व्यस्त होते. या कारणामुळे त्यांनी १९८७ मध्ये राजकारणातून सन्यास घेतला.

जया बच्चन

अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन या २००४ पासून आतापर्यंत समाजवादी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत. जया बच्चन या संसदेतील आपल्या भाषणासाठी चांगल्याच प्रसिद्ध आहेत.

राजेश खन्ना

बॉलीवूडमधील पहिले सुपरस्टार अशी ख्याती असलेले राजेश खन्ना यांनी १९९१ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते हरले होते, पण १९९२ मध्ये त्याच दिल्लीच्या जागेवर काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढवताना ते जिंकले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे उमेदवार होते. शत्रुघ्न सिन्हा गेल्या ३३ वर्षांपासून राजकारणात आहेत.

धर्मेंद्र

धर्मंद्र देखील २००४ मध्ये राजकारणात आले होते. त्यांनी भाजपच्या तिकीटावर राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक जिंकली होती. पण, २००८ मध्ये त्यांनी राजकारण सोडून दिलं. २०१९ मध्ये धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओलला भाजपने गुरुदासपूरमधून तिकीट दिलं होतं. यात त्यांचा विजय झाला.

'ड्रीम गर्ल'

हेमा मालिनी या राजकारणात सक्रिय आहेत. ड्रीम गर्लला भाजपने मथुरामधून पुन्हा तिकीट दिलं आहे. त्या २०१४ पासून मथुरा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात.

राज बब्बर

उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांमध्ये राज बब्बर यांचे नाव घेतले जाते. ते तीन वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेवर गेले आहेत.

विनोद खन्ना

विनोद खन्ना हे देखील दीर्घ काळासाठी राजकारणात राहिले आहेत. शिवाय २००२ मध्ये केंद्रात पर्यटन मंत्री होते. २००३ मध्ये विदेश मंत्री देखील राहिले आहेत. यावेळी भाजप त्यांच्या पत्नी कविता खन्ना यांना तिकीट देण्याच्या तयारीत आहे.

सुनील दत्त

सुनील दत्त आणि राजीव गांधी यांची चांगली मैत्री होती असं सांगितलं होतं. त्यांच्यामुळे सुनील दत्त राजकारणात आले होते. सुनील दत्त पाचवेळा खासदार राहिले आहेत. २००४ मध्ये त्यांना युवा आणि क्रीडा मंत्रालयाचा मंत्री बनवण्यात आलं होतं.

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर यांनी देखील राजकारणात नशिब आजमावलं. त्यांनी काँग्रेसकडून लढताना भाजपच्या गोपाळ शेट्टीविरोधात २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवबंधन बांधलं होतं.

इतर काही कलाकार

भोजपुरी फिल्मस्टार मनोज तिवारी, रवि किशन यांचा राजकारणात चांगला जम बसलाय. त्यांना भाजपकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. दिनेश लाल यादव हेही भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. याशिवाय परेश रावल, मिथुन चक्रवर्ती, प्रकाश राज, शबाना आझमी हे कलाकार देखील राजकारणात पाहायला मिळतात. एकंदरीत राजकारण आणि बॉलिवूड यांच्यामध्ये परस्परसंबंध पूर्वीपासूनच राहिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT