मुंबई - ‘बॉम्बे हाउस’ हे टाटा समूहाचे मुख्यालय. या वास्तूवर रतन टाटा यांचे विशेष प्रेम होते. नुकतेच त्यांनी या वास्तूचे अंतर्गत नूतनीकरण देखील करून घेतले होते. शंभर वर्षांचा वारसा असलेल्या या वास्तूचा पुरातन लूक कुठेही ढळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी या मुख्यालयात भटक्या कुत्र्यांसाठी तयार केलेले विशेष कक्ष चर्चेचा विषय ठरले होते.
सुमारे एकवीस हजार २७३ चौरस फुटांच्या जागेवर वसलेले हे मुख्यालय १९२४ मध्ये अस्तित्वात आले. ज्या शहरात आपला व्यवसाय आहे त्या शहराचे नाव आपल्या उद्योगसमूहाच्या मुख्यालयाच्या इमारतीला द्यावे ही बहुधा देशातील एकमेव घटना असावी. मुंबई महापालिकेने ही जमीन १९२१ मध्ये विक्रीला काढली. ज्या स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांनी ‘गेटवे ऑफ इंडिया’चा आराखडा तयार केला त्यांनीच या इमारतीचा आराखडा बनवला.
त्यावेळी या मुख्यालयात वस्त्रोद्योग, हॉटेल, पोलाद आणि ऊर्जानिर्मिती या टाटांच्या व्यवसायांची कार्यालये होती. दोराबजी टाटा त्यांचे कामकाज पाहत होते. त्यानंतर येथे चौथा मजला उभारण्यात आला. तेथे टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा मोटर, टाटा सन्स यांचे वरिष्ठ अधिकारी कामकाज करतात.रतन टाटा हे प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जात. या प्रेमापोटी त्यांनी टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये श्वानांसाठी आसरा दिला.
यासाठी आग्रह
कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता
राष्ट्रहितालाच प्राधान्य
मुक्त बाजारपेठ खुल्या स्पर्धेचे स्वागत
कंपनीत सर्वांना समान संधी
पारदर्शक व्यवहारावर भर
कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई
आरोग्य, सुरक्षा, पर्यावरणविषयक नियमांना प्राधान्य
उत्पादन, सेवांचा दर्जा सर्वोत्तमच हवा
सामाजिक दायित्वाचे पालन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.