Viral Video 
देश

Viral Video: भांडी घासायचा कंटाळा आलाय; भावाने एकदम भारी जुगाड शोधून काढलाय, हर्ष गोयंकांनी घेतलीये दखल

Method Of Avoiding Dishwashing: एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- स्वयंपाक तयार केला, जेवण केलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडे पडतात. अनेकांना ही भांडी घासण्याचा खूप कंटाळा असतो. बेंगळुरुसारख्या शहरामध्ये तर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशावेळी भांडे घासण्याची इच्छा असून अनेकांना भांडी घासता येत नव्हती. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. (Bored to wash dishes Harsh Goenka taken notice Man Unconventional Method Of Avoiding Dishwashing)

व्हिडिओमध्ये दिसतंय की एका व्यक्तीने स्वयंपाक केला आहे. तो अन्न ताटात घेऊन जेवणारच असतो तर त्याला काही सूचतं. जेवल्यानंतर भांडे घासावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल असा विचार करुन तो एक युक्ती शोधून काढतो. तो ताट, ग्लास, चमचा सर्व प्लॅस्टिकने गुंडाळतो आणि अशा पद्धतीने तो जेवण करतो. जेवण झाल्यानंतर तो फक्त फ्लॅस्टिक काढतो आणि ताट-वाट्या न धुता रॅकमध्ये ठेवून देतो.

सोशल मीडियावर चर्चा

व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हर्ष गोयंका यांनी सोमवारी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर या व्हिडिओवरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हर्ष गोयंका यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, जेव्हा आपल्याकडे भांडे धुण्यासाठी पुरेसे पाणी नाही त्यावेळी ही पद्धत चांगली आहे.

व्हिडिओवरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींनी हर्ष गोयंका यांना समर्थन दिलंय तर काहींनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, पाणी वापर कमी करण्यासाठी किंवा पाण्याची कमतरता असल्यास ही पद्धत चांगली आहे. दुसरीकडे, विरोधातील लोकांचे म्हणणे आहे की, यामध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर वाढेल आणि पर्यावरणासाठी ते धोकादायक ठरेल.

देशात सुरु व्हावा वापर

एका युझर्सने म्हटलं की, अनेक देशांनी अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर फार पूर्वीपासून सूरु केला आहे. त्यामुळे आपणही या पद्धतीचा वापर सुरु करायला हवा. कारण, येत्या काळात पाण्याच्या टंचाईची वेळ येणार आहे. एका युझर्सने म्हटलंय की, अशा पद्धतीमध्ये ५० ते ६० ml जाडीच्या प्लॅस्टिकचा वापर करण्यात येऊ नये. १०० ml जाडीच्या प्लॅस्टिकच्या वापराने त्याचे रिसायकलिंग करता येईल. (Viral News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT