Latest Marathi News Live Update  Sakal
देश

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 19 july 2024 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी वीस जुलैपासून (शनिवार) बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Congress: विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान यांच्या उपस्थित आहेत.

Thane: 'एमएमआर' शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार, ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी

ठाणे पल्याडची शहरांत वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी नवी मुंबई एनएच - ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २ समित्या गठीत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सदर योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Kolhapur: मायक्रोसॉफ्ट डाऊनचा कोल्हापुरातील विमानसेवेवरही परिणाम

जगभरात मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे झालेल्या गदारोळात कोल्हापूर विमानतळावरील दोन इंडिगो च्या विमानांना फटका बसला आहे. हैदराबाद येथे जाणाऱ्या विमानास 26 मिनिटे तर बंगळुरूला जाणाऱ्या विमानास सहा मिनिटे उशीर झाला.

Puja Khedkar Live : दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात २५ जुलैपर्यंत दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Congress Meeting Live : काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक; विधानसभेसाठी स्टॅटर्जी ठरणार 

काँग्रेसची आज संध्याकाळी आठ वाजता कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. यानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांची होणार यादी जाहीर होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची स्ट्रॅटर्जी देखील ठरवली जाणार आहे. दिवसभरातील काँग्रेसची ही तीसरी बैठक आहे

शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीने घेतलेल्या हस्तक्षेपावर आर्थिक गुन्हे शाखेचा आक्षेप

शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीने घेतलेल्या हस्तक्षेपावर आर्थिक गुन्हे शाखेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. क्लोजर रिपोर्टवर ईडीचा हस्तक्षेप नको अशी भूमिका आर्थिक गुन्हे शाखेने घेतली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडी कडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती.

Election Live : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान

नागपूर जिल्हा परिषदेच्या एका व विविध पंचायत समित्यांच्या चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.

नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख.) या निवडणूक विभागाची जागा रिक्त आहे; तसेच धुळे पंचायत समितीच्या बोरीस, बाळापूर (जि. अकोला) पंचायत समितीच्या बटवाडी बु, काटोल (जि. नागपूर) पंचायत समितीच्या पारडसिंगा आणि रामटेक (जि. नागपूर) पंचायत समितीच्या बोथिया पालोरा या निर्वाचक गणांच्या जागा रिक्त आहेत. या पाचही जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

नामनिर्देशनपत्रे 23 ते 29 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी (ता. 28 जुलै) या सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 30 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचे वाटप 5 ऑगस्ट 2024 रोजी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

MIM Protest Live : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमच्या वतीने विशाळगड प्रकरणी निदर्शने करण्यात आली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुस्लिमांवर झालेला अन्याय दूर करावा आणि तसे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इम्तियाज जलील यानी केलीय. खुलेआम मशिदीत तोडफोड केली गेली. आज आम्ही शांत बसलो तर ही वृत्ती बळावते, त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं इम्तियाज म्हणालेत. शिवाय आज शांतता प्रस्थापित करणारे मशिदीमध्ये तोडफोड सुरू असताना घरात बसले होते. गजापुर गावात मुस्लिमांवर अन्याय केले गेले. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेक्युलर म्हणतात, पण ज्यावेळी ते ठिकठिकाणी निवेदन देत होते त्यावेळी एकतरी मुस्लिमेतर सोबत होता का? हा प्रश्न उपस्थित केला. त्यासोबत तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका, घरावर हल्ला केले तर सहन करू पण मशिदीवर हल्ला करणार असाल तर शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

Sanjay Raimulkar Live updates: आमदार संजय रायमुलकर यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

आमदार संजय रायमुलकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरु होती. बैठीकीला आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते. रायमुलकर यांच्या छातीत अचानक कळ निघायला लागल्याने त्यांना तातडीने बुलढाणा येथील खाजगी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.

Pooja Khedkar Live updates : मनोरमा खेडकरची कंपनी सील, कर न भरल्यास लिलाव होणार

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थरमोव्हेरीटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अखेर सिल केलं असून महापालिकेचा 2 लाख 77 हजारांचा कर थकविल्याने कर संकलन विभागाने ही कारवाई केली आहे. थकित कर न भरल्यास सिल केलेली कंपनीची मिळकतीचा 21 दिवसानंतर लिलाव करणार असल्याचं कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी सांगितलं.

Rain Live updates : राष्ट्रीय महामार्ग 66 कुमठ्याजवळ दरड कोसळली

कर्नाटकातल्या कुमठाजवळच्या बर्गी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पुन्हा दरड कोसळली आहे. चार दिवसांपूर्वी येथे दरड कोसळली होती ती दरड कोसळण्याचे प्रमाण कमी असल्याने एका बाजूने वाहतूक बंद ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. पण आता दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

microsoft crash live : दिल्ली विमानतळावर हाताने लिहून दिले जात आहेत बोर्डिंग पास

'मायक्रोसॉफ्ट'मधील तांत्रिक अडचणीचा फटका दिल्ली विमानतळाला बसला असून दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. चेक-इन करण्यासाठी वेळ लागत आहे. विमानतळ प्रशासनाकडून बोर्डिंग पासदेखील हाताने लिहून दिले जात आहेत.

Nashik Crime Live: अंबड एमआयडीसी परिसरातील बँकेवर दरोडा

अंबडच्या इंडियन बँकेत गॅस कटरच्या सहाय्याने स्लॅब फोडून दरोड्याचा प्रयत्न, बँकेतील लॉकर्स, तिजोरी लुटण्याचा प्रकार मध्यरात्री २ वाजेची घटना, घटनास्थळी पोलिसांचा पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांचे तीन पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना, वर्षभरात याच बँकेत दुसरा दरोड्याचा प्रयत्न, बँकेच्या सुरक्षितते अभावी घडला प्रकार.. बँकेचा सायरन वाजला तरीही व्यवस्थापकाकडून कानाडोळा,

Vishalgad Dispute Live: संभाजीनगरमध्ये विशाळगड प्रकरण तापले, मुस्लिम संघटना करणार निदर्शने  

संभाजीनगरमध्ये विविध मुस्लिम संघटना आणि एमआयएमच्या वतीने दिली जाणार निदर्शने. ५०० हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. नमाजनंतर विभागीय कार्यालयासमोर आंदोलनास सुरवात

Pune Live: धानोरीत मराठी भाषेचा अपमान व अवमान करणार्‍याला मनसे कार्यकर्त्यांनी दिला जोरदार चोप

विश्रांतवाडी, १९- धानोरी उपनगरातील एका व्यावसायिकाकडे काम करणार्‍या परप्रांतीय कामगाराने मराठी ग्राहकांशी वाद घालत ‘‘मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा?’’ असे म्हणत हेकेखोरपणे उद्धट वर्तन करणार्‍या कामगाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी दणका दिला.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाला. यामुळे धानोरीतील मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यावसायिकाकडे भेट दिली. त्याचे उद्धट वागणे व मराठीबद्दलची अनास्था पाहून मनसे कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले

Maharashtra Congress Live Updates: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विदर्भात 62 जागेपैकी 55 जागा लढणार?

  • आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विदर्भात 62 जागेपैकी 55 जागा लढणार असा प्रस्ताव आजच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

  • काँग्रेस पक्षाला विदर्भात चांगले वातावरण आहे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे.

  • काँग्रेस पक्षाने 55 जागा लढल्यास याचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी चर्चा ही बैठकीत करण्यात आली आहे. अशी सुत्रांची माहिती आहे.

Vinay Mohan Kwatra Live Updates: विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती

  • विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती

  • विनय मोहन क्वात्रा लवकरच पदभार स्वीकारणार

  • क्वात्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात

  • खलिस्तानी फुटीरतावादी आणि अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याच्या कथित भारतीय कटावरून देशाचे संबंध ताणले असताना ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय

  • क्वात्रा हे १९८८ च्या IFS बॅचचे अधिकारी आहेत

Vishalgad Fort Violence Live Updates: विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं? हायकोर्टाने विचारला प्रश्न

  • शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिका-याला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश

  • याचिकाकर्त्यांनी त्या दिवशी तिथं झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ कोर्टात दाखवले

  • 'जय श्री राम' चा नारा देत शिवभक्त तोडफोड करत असल्याचं व्हिडीओतून स्पष्ट

  • तिथं उपस्थित अधिका-यांनीच जमावाला मोकळीक दिल्याचा आरोप

  • विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होत? - हायकोर्ट

  • कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची?, हायकोर्ट

Pooja Khedkar Live Updates: पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या घरी 

वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या घरी तिची चौकशी करण्यासाठी पोहोचले. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

खेडकर यांनी काल पुण्यात पोलिसांसमोर हजर होऊन जबाब नोंदवायचा होता. मात्र आजही त्या वाशिम येथील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहे.

Nagpur Rain Live Updates: नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील 'नांद' नदीला पूर

  • वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावे प्रभावित

  • नागपूरच्या उमरेड आणि वर्धेच्या हिंगणघाट तालुक्यातील गावांचा समावेश

  • नदीवरील छोटे पूल पाण्याखाली आल्याने काही गावांचा संपर्क तुटला

Prasad Lad Live Updates: भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन

  • भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन

  • फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ, तसेच बघून घेऊ अशी धमकी

  • तब्बल शेकडो धमकीचे फोन

  • फोन कोणी केले याची माहिती अद्याप स्पष्ट नाही

NEET UG 2024 Live Updates: NEET पेपर लीक प्रकरणी CBI ची मोठी कारवाई

  • NEET पेपर लीक प्रकरणी CBI ची मोठी कारवाई

  • CBI ने झारखंडच्या रांची मधून एका विद्यार्थ्याला घेतल ताब्यात

  • आतापर्यंत या प्रकरणी CBI ने काही लोकांना अटक केली आहे मात्र कुठल्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची ही पहिली वेळ आहे

  • MBBS 2023चा हा विद्यार्थी असल्याची माहिती

  • आणखी काही विद्यार्थी यात सहभागी आहेत का याचा तपास सुरू

उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स  बंधनकारक

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं कावड यात्रेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेकरूंसाठी उचलल मोठं पाऊल. आता उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचा सरकारनं दावा केला आहे. पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे सरकारचे संकेत.

Vidhan Parishad Election : काँग्रेसच्या ५ आमदारांवर होणार कारवाई

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणात काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 5 आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. सूत्रांची माहितीनुसार 2 आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश. कारवाई होणाऱ्या आमदारमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची माहिती आहे.

Pooja Khedkar : पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दिली दुसरी नोटीस

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस पाठवली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन ही नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती. पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन काल 18 जुलै रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस दिल्याची माहिती. पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर मुक्कामी आहेत. उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

Sambhaji Nagar Live : वाळूज MIDC परिसर गोळीबाराने हादरला

वाळूज MIDC परिसर गोळीबारानं हादरला. वाळूजच्या वडगाव कोल्हाटी भागात एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. छातीत गोळ्या घालून आरोपी फरार झाला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आला.

Mumbai Live : अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, सांताक्रुज, विलेपार्ले, मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. परिणामी मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. अंधेरी सबवे तीन ते चार फुटापर्यंत पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि कामगार यांची देखील मोठी अडचण होत आहे.

Buldhana Accident live : कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार; सोनाळा ते जळगाव जामोद रस्त्यावरील घटना

भरधाव कारच्या धडकेत सोनाळा येथील एक दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा ते जळगाव जामोद राज्य महामार्गावर काल रात्रीच्या वेळी घडलीये. यातील वाहन चालक असलेला अज्ञात आरोपी फरार झाला असून कारच्या धडकेत मृत पावलेल्या युवकाचे नाव दत्ता भोंडे (वय 21) राहणार सोनाळा असे आहे. याप्रकरणी मृतकाचे काका यांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाळूज MIDC परिसर गोळीबाराने हादरला; वडगाव कोल्हाटी भागात एकाची गोळ्या घालून हत्या

छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC परिसर गोळीबाराने हादरला आहे. वाळूजच्या वडगाव कोल्हाटी भागात एकाची गोळ्या घालून हत्या झालीये. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Mumbai Rain LIVE : मुंबईसह मरिन ड्राइव्ह परिसरात पावसाची तुफान बॅटिंग

मुंबईत दादर, भायखळा, मरिन ड्राइव्ह, गिरगाव परिसरात पावसाचा जोर अधून-मधून कायम, मात्र अद्यापतरी पावसामुळे कुठेही पाणी साचले नाही आहे. मुंबईत सकाळी मरिन ड्राइव्ह परिसरात पावसाची तुफान बॅटिंग पहायला मिळत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईरांना पुन्हा एकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. दरम्यान, सकाळच्या सत्रातील पडणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफ लाईनवर झाला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिट उशिराने, तर हर्बर लाईनवर १० ते १५ मिनिट लोकल उशिराने येत आहे.

Earthquake in Chile News : चिलीमध्ये 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

चिलीतील अँटोफागास्ता येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.3 इतकी मोजली गेलीये. भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीतील अँटोफागास्ता शहर होते. अद्याप सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Air India Live : दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान रशियात उतरले, एअर इंडियाने काय दिले कारण?

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान कंपनीने ही माहिती दिली. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील पोस्टमध्ये म्हटलंय की, विमान आपला मार्ग वळवून क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

Mumbai-Pune Expressway Accident Live : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर पाच वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून केवळ दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला.

Mumbai Rain LIVE : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईसह परिसरात पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी

मुंबईसह परिसरात आज पावसाने पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Ratnagiri Orange Alert live : रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट; लांजा, राजापुरात पावसाचा जोर वाढला

रत्नागिरीत आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. कालपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरु असून आज पहाटेपासून पावसाची रिपरिप पहायला मिळतेय. लांजा, राजापूर, रत्नागिरी या भागात पावसाचा जोर अधिक आहे.

Hasan Mushrif live : पालकमंत्री मुश्रीफ आज विशाळगडला भेट देणार

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवारी (ता. १९) विशाळगडला भेट देणार आहेत. त्यांचे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होऊन त्यांचे विशाळगडाकडे प्रयाण होणार आहे. येथून दुपारी तीन वाजता विशाळगड (गजापूर) येथे आगमन होऊन पीडित कुटुंबांची भेट घेणार आहेत. येथून दुपारी चार वाजता कोल्हापूरकडे प्रयाण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता कागलकडे प्रयाण होऊन त्यांचा मुक्काम राहणार आहे.

Wagh Nakh Shivaji Maharaj LIVE : ऐतिहासिक वाघनखांचे आज साताऱ्यात अनावरण; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखांचे अनावरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे व शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटांचे अनावरण आज (शुक्रवारी) दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारपासून (ता. २०) वाघनखे पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

Maratha Reservation live : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Maharashtra News live Updates 19 july 2024 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी वीस जुलैपासून (शनिवार) बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेचा (नीट-यूजी) शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल शनिवारी (ता. २०) दुपारपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखांचे अनावरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे व शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटांचे अनावरण आज (शुक्रवारी) दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT