Latest Maharashtra News live Updates esakal
देश

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 5 August 2024 : वर्ष 1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. तब्बल 71 वर्षांनंतर यंदा हा योग पुन्हा आलाय.

सकाळ डिजिटल टीम

नांदगावकरांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मुंबईत जल्लोष

मनसेकडून बाळा नांदगावकर यांची शिवडी विधानसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर मनसेकडून ठीक ठिकाणी बॅनरबाजी तसेच लालबाग येथे मनसेने जल्लोष साजरा केला. लालबाग येथील मनसेच्या शाखेसमोर मनसेकडून ढोल वाजवून जल्लोष करण्यात आला.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित आहेत. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Sonia Doohan: सोनिया दूहान उद्या करणार काँग्रेस पक्षात प्रवेश

सोनिया दूहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

राहुल गांधीनी घेतली परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांची भेट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांची भेट घेतली. बांगलादेशातील घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

Pune Crime: सराईत गुन्हेगाराकडून विविध ठिकाणचे सहा गुन्हे उघडकीस

गणेश गोल्ड अॅण्ड इमिटेशन ज्वेलरी या दुकानाच्या चोरी प्रकरणी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये कार, दुचाकी व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांनी विविध पोलीस ठाणे हद्दीत सहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

 Raj Thackeray Live : राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धारशिवमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट मागीतली होती. मात्र ती नाकारल्याने संतप्त झालेल्या मराठा बांधवानी हॉटेलच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आंदोलक आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत.

Bangladesh Violence Live : एअर इंडियाकडून बांगलादेशला जाणारी सर्व विमाने रद्द

बांगलादेश मधील सध्याची परिस्थिती पाहता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने बांगलादेशसाठी विशेषत: ढाकाला जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. कंपनीकडून प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत दिले जाणार आहेत.

Devendra Fadnavis Live : फडणवीस नागपूरच्या कल्याणेश्वर शिव मंदिरात झाले नतमस्तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या कल्याणेश्वर शिव मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले.तसेच पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने फडणवीसांनी येथे पूजा देखील केली.

Bangladesh Violence Live : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना हिंडन विमानतळावर उतरल्या

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या उत्तर प्रदेशमधील हिंडन विमानतळावर उतरल्या आहेत. त्या लवकरच दिल्लीला पोहचणार असून पुढे त्या लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

Bangladesh Violence : बीएसएफकडून भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी

बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Pune Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खडकवासला धरण पाहणीसाठी येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खडकवासला धरण पाहणी करण्यासाठी येणार आहेत.काही वेळातच ते खडकवासला धरणावर पोहचतील. ते खडकवासला पाटबंधारे अधिकारी याच्यासोबत चर्चा करणार आहेत.

Bangladesh PM Sheikh Hasina Live Updates शेख हसीना दिल्लीत येण्याची शक्यता

शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना यांचं विमान सध्या भारताच्या हद्दीत आहे. बिहारमधे त्यांचं विमान आहे.त्या दिल्लीत येण्याची शक्यता आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina Live Updates : शेख हसीना यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा.लष्कर प्रमुख पत्रकार परिषदेत म्हणाले..

अंतरिम सरकार आम्ही स्थापन करू.आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ आणि देशात सरकार स्थापन करू.देश चालवणे गरजेचे आहे.आमच्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवावा आणि कुठलाही हिंसाचार करू नका.आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करू.तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आम्ही घेत आहोत,असे बांगलादेशाच्या लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या लेटलतिफ कंत्राटदारांवर फक्त 35 कोटींचा दंड

मुंबईतील महत्वाकांक्षी असलेला मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची डेडलाईन चुकली असून अद्यापही काम पूर्ण केव्हा होईल याची नवीन डेडलाईन दिली गेली नाही. मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या लेटलतिफ कंत्राटदारांवर फक्त 35 कोटींचा दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पालिकेने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची विविध माहिती विचारली होती. मुंबई किनारा रस्ता प्रकल्प विभागाने अनिल गलगली यांस कळविले की मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम 3 भागामध्ये विभागले आहे.

भाग 1 अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून आतापर्यंत या कामात 11.63 कोटींचा दंड आकारला आहे. यापूर्वी भाग 1 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 9 जून 2023, 10 सप्टेंबर 2023 आणि 22 में 2025 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mumbai Congress Live: भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती यंदा जोरात साजरी, काँग्रेसचा निर्धार

यंदा भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती यंदा जोरात साजरी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलं आहेअसं नाना पटोले यांनी सांगितलं आहे . या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. गांधी यांचं योगदान देशासाठी मोठं आहे. जग मोठी ठेवण्यासाठी त्यांनी स्वप्न देशाच्या लोकांसाठी स्वप्न पाहिले ते पूर्ण केलं लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल या सगळ्यात पुढे नेण्याचं काम राजीव जींनी केलं असं नाना पटोले म्हणाले.

Eknath Shinde Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पुण्यातील पूरग्रस्त भागाची आणि पूरग्रस्तांची भेट

- पुण्यातल्या शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील पूरग्रस्त भागाची एकनाथ शिंदे करणार पाहणी

- ⁠त्यानंतर महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार

- ⁠शिवाजीनगर नंतर मुख्यमंत्री सिंहगड रोड येथील एकता नगर कडे रवाना होणार

Bangladesh PM Sheikh Hasina Live Updates: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात रवाना

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना हिच्यासह लष्करी हेलिकॉप्टरमधून बंगा भवन सोडले, बांगलादेश मीडिया अहवाल

 Rahul Gandhi Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी मजुरांची घेतली भेट 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सामान वाहणाऱ्या मजुरांची भेट घेतली

Supreme Court Live Updates: दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली सरकारला बजावली नोटीस

दिल्लीमध्ये यूपीएससी शिकवणी वर्गामध्ये पाणी घुसून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत केंद्र आणि दिल्ली सरकारला बजावली नोटीस. सुरक्षेच्या नियमांचं पालन केल्याशिवाय कोणत्याही संस्थेला शिकवणी वर्ग चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये.

Tejashwi Yadav Live : तेजस्वी यादव यांची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकार लोक कल्याणासाठी काम करत नाही. बिहारसारख्या गरीब राज्यात लोकांना चांगले शिक्षण, चांगले कारखाने, उद्योगधंदे मिळायला हवेत, महागाईशी, किंवा गरीबीशी काहीही देणेघेणे नाही त्यांना फक्त हिंदू-मुस्लिम करून राजकारण करायचे आहे. असे नेते तेजस्वी यादव म्हणाले.

Nashik Live : नाशिकच्या गिरणा नदीत मासेमारी करण्यासाठी आलेले 15 लोक अडकून पडले

नाशिकच्या मालेगावच्या सवडगाव शिवारात गिरणा नदीत मासेमारी करण्यासाठी आलेले 15 लोक अडकून पडले होते, गिरणा नदीला मोठा पूर असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मालेगाव महापालिकेचे अग्निशामक दल व पट्टीचे पोहणारे पोहचले मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने धोका अधिक असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले,रात्री ndrf पथक पोहचले मात्र सकाळी त्यांनाही त्यात अपयश आले त्यामुळे आमदार मुफ्ती मौलाना,सर्व प्रशासकीय यंत्रणा च्या मदतीने लष्कराच्या हेलिकॅप्टर द्वारे सर्व 15 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Ujani Dam Live : उजनी धरण 100% भरले; 117 टीएमसी इतका पाणीसाठा

उजनी  धरण 100% भरले; 117 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या दोन लाख पाच हजार विसर्गने पाणी येत असून धरणातून भीमा नदीत एक लाख क्युसेक विसर्ग केला जातोय.

Isapur Dam Live : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पन्नास टक्के पाणीसाठा

‘इसापूर’ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी पावसाळा सुरू झाल्यापासून धरणातील पाणीसाठ्यात केवळ २३ टक्के वाढ झाली आहे. धरणामध्ये आता जवळपास ५०.८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ६२.९१ टक्के इतके होते. सिध्देश्वर धरणात ५०. ८८ तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पर्जन्यमान होत आहे. समाधानकारक साठ्यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

school update live: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उद्या बंद राहण्याची शक्यता

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उद्या बंद राहण्याची शक्यता आहे. विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व काही मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील शिक्षकही शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याने मुंबईतील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

Prasad Lad Live:  मनोज जरांगे पाटील यांची EWS बद्दलची मागणी योग्य - आमदार प्रसाद लाड

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. परंतु या आरक्षणाला पर्याय म्हणून EWS ची मागणी महायुती सरकारने केली होती. ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली EWS बद्दलची मागणी योग्य आहे.

Delhi Live: सुप्रीम कोर्टाचा दिल्ली सरकारला झटका, 'अल्डरमेन' नियुक्तीचे केले समर्थन

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेमध्ये 10 'अल्डरमेन' नियुक्त करण्याच्या दिल्लीच्या उपराज्यपालांच्या निर्णयाला समर्थन दिले.

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की दिल्ली महानगरपालिकेत 10 'अल्डरमेन' नियुक्त करण्याच्या एलजीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मदतीची आणि सल्ल्याची गरज नाही.

MCD मध्ये सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा सर्वोच्च न्यायालय LG चा अधिकार वैधानिक अधिकार आहे आणि कार्यकारी अधिकार नाही.

Kolhapur Flood Live: कोल्हापूरात पाऊस ओसरला पण पूराचा धोका कायम

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचं पाणी एकदम संथगतीनं कमी होत आहे. कृष्णेसह पंचगंगा, वारणा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत इंचाइंचानं घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती कायम आहे.

Delhi News Live: सुप्रीम कोर्टाचा दिल्ली सरकारला दणका

सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दणका दिला आहे. दिल्ली महानगरपालिकेत (MCD) 10 'एल्डरमन' नामांकित करण्याच्या नायब राज्यपालांच्या निर्णयाचे कोर्टाने समर्थन केले आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारची याचिका फेटाळली आहे.

BJP Meeting Live: मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडून समितीची स्थापना करण्यात आलीये. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 सदस्यांचा समितीत समावेश आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची बैठक होत आहे.

Pooja Khedkar Live News: पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. UPSC ने पूजा खेडकरचं IAS पद रद्द केल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. DOPT ला देखील पक्षकार बनवण्यात आलं आहे. काल रात्री यासंदर्भात याचिका ऑनलाईन दाखल केली आहे. लवकर सुनावणी घ्यावी यासाठी आज सकाळी कोर्टात प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे.

Pune News LIVE : पुण्यात भर रस्त्यावर कोयत्याने वाईन शॉपची तोडफोड

पुण्यात भर रस्त्यावर कोयत्याने वाईन शॉपची तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरात घडलाय. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार अज्ञात हल्लेखोरांनी वाईन शॉपची तोडफोड केलीये. न्यूयॉर्क वाईन शॉप असं दुकानाचं नाव आहे. रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

Dhom Dam LIVE : धोम धरणातून विसर्गात वाढ करण्याचे नियोजन रद्द

आज सकाळी सात वाजता धोम धरणाची पाणी पातळी 744.90 मी. असून एकूण पाणीसाठा 11.3 अ.घ.फु., 83.73 टक्के झाला आहे. धोम धरणाचे पाणलोट क्षेत्रामधील पावसाच्या प्रमाणात व आवकमध्ये घट झाली असल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 10.00 वाजता सांडव्यावरून व विद्युत ग्रहातून सोडलेल्या विसर्गात वाढ करण्याचे नियोजन रद्द करण्यात येत आहे.

Pune News LIVE : पुण्यात हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत चक्क पोलिस उपनिरीक्षकाचा सहभाग

पुण्यात हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत चक्क पोलिस उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याचे समजते. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक पसार झाला आहे. काशिनाथ मारुती उभे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मोहजालात अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अवंतिका सोनवणे, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना अटक करण्यात आलीये.

Wayanad Landslide LIVE : वायनाडमधील भूस्खलनात 308 जणांचा मृत्यू; शोध-बचाव कार्य अद्याप सुरुच

केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. दुर्घटनेनंतरचा आज सातवा दिवस आहे. मृतांचा आकडा 308 वर पोहोचला आहे.

Veer Dam LIVE : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

वीर धरणाची पाणी पातळी कमी झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आता कमी होत आहे. आज सकाळी ६.०० वाजता वीर धरणाच्या वरील भागातील निरा देवघर धरण (९४.४४%), भाटघर धरण १०० % तर गुंजवणी धरण (८९.४६%) भरलेली असल्याने व या सर्व धरणांतून विसर्ग नियंत्रित होऊन काही प्रमाणत कमी झाला असून वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक देखील कमी होत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत फारशी वाढ होत नसून ती कमी होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, आज पहाटे ७.३० वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४१७३३ क्युसेक्स एवढा विसर्ग कमी करून तो आता ३२४५९ क्युसेक करण्यात येत आहे.

Bihar News LIVE : बिहारच्या हाजीपूरमध्ये विजेचा धक्का लागून 9 जणांचा मृत्यू, 6 जण होरपळले

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे रविवारी रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना घडली. पहेलजा येथे गंगा नदीतून पाणी आणणाऱ्या नऊ जणांचा जळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास औद्योगिक पोलिस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर गावात घडली. हायव्होल्टेज वायरचा धक्का लागून आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर भाजले आहेत.

C Siddaramaiah LIVE : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बेळगाव दौऱ्यावर

बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज (ता. ५) बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्ह्यातील गोकाक आणि चिक्कोडी तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करतील. आज (सोमवार) मुख्यमंत्री जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करणार आहेत.

Tanaji Sawant LIVE : पोलिस निरीक्षक सावंत यांची सांगलीला बदली

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांची सांगली येथे बदली झाली. जिल्ह्यात सात वर्षांचा कार्यकाल त्यांनी पूर्ण केला. तसेच पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा आदेश केला.

Shravan Somavar LIVE : आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त

श्रावणी सोमवारनिमित्त आज मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. आज पहिलाच श्रावण सोमवार असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक बाबुलनाथ मंदिरात येत असतात. आज मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Urmodi Dam LIVE : उरमोडी धरणातून आज ३५०० क्युसेक विसर्ग करण्यात येणार

पाणी आवक व पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उरमोडी धरणाचा विसर्ग आज सकाळी ८:०० वाजता ४५०० क्युसेक वरून ३५०० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे उरमोडी नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Shravan Somavar LIVE : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा सोमवारपासून श्रावणाची सुरुवात

Latest Marathi Live Updates 5 August 2024 : वर्ष 1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. तब्बल 71 वर्षांनंतर यंदा हा योग पुन्हा आलाय. त्यासोबतच 18 वर्षांनंतर 5 श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर गेला असून आज पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व गांधी नॅशनल मेमोरीयल सोसायटीच्या विश्वस्त सचिव शोभना रानडे (वय ९९) यांचे मुंढव्यातील राहत्या घरी निधन झालेय. आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत होणार आहे. तसेच राज्यात घाटमाथा, मध्य व पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी धरणांतून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT