Latest Maharashtra News live Updates esakal
देश

Latest Maharashtra News Updates : आरे जंगलात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास पोलीसांचा विरोध

Breaking Marathi News live Updates 7 August 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ डिजिटल टीम

आरे जंगलात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास पोलीसांचा  विरोध

आरे जंगलात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास पोलीस प्रशासनानं विरोध केला आहे. जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यासाठी आदिवासी बांधवांनी आरे पोलीस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. 22 जुलै 2024 रोजी पोलिसांकडे परवानगी अर्ज देऊनही कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. आदिवासी बांधवांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी नाराजी आहे. परवानगी नाकारली तरी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यावर आदिवासी बांधव ठाम आहेत. 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आरे चेक नाका ते आरे डेअरीपर्यंत आदिवासी बांधव प्रभात फेरी काढणार आहे. अडीच हजाराहून अधिक आदिवासी बांधव प्रभात फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.

BJP Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आमदारांची बैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी उत्तर महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक होणार आहे.बैठकीसाठी भाजप आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, बबनराव पाचपुते, जयकुमार रावल, सुरेश भोळे दाखल झाले आहेत.

Manu Bhakar: मनु भाकर यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

ऑलिंपिकमधे २ पदक जिंकणाऱ्या मनु भाकर यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली

Mns: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या आहेत. कसबा पेठेत मनसे पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बांगड्या घालणे व मेंहदी काढणे या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली

Crime News Live : खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करून हॉटेल मालकाची फसवणूक; एकाला अटक

खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करून कुलाब्यातील बडे मिया हॉटेल मालकाची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा देखील गैरवापर केला. इतकेच नाही तर हा आरोपी वर्षभरापासून खासदारांच्या नावे हॉटेल मालकाची फसवणूक करत होता.

त्याने वर्षभरात तब्बल ९ लाख २७ हजारांची फसवणूक केली. हॉटेल मालकाच्या मुलीला चर्चगेट येथील शासकीय लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्याच्या नावाखाली हॉटेल मालकाला सात लाखांचा गंडा घातला तर खासदारांच्या नावाचा गैरवापर करून आजवर तब्बल २ लाख रुपयांचे फुकट जेवण मागवलं.

अरविंद सावंत यांच्या कार्यालयातूनच याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. तोतयागिरीचा प्रकार समोर येताच काळाचौकी पोलिसांनी केली आरोपी सुरज कलव, ३० याला अटक केले. आरोपीवर याआधी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime Live : 'भाई’च्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचे तरुणावर कोयत्याने वार; संशयिताला अटक

पुणे, ता. ६ : ‘भाई’च्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच, वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना सोमवारी मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी प्रवीण भगवान कांबळे (वय ३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश ऊर्फ गोट्या चंद्रकांत मोरे (रा. पाषाण) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सतीश मोरे या संशयिताला अटक केली आहे.

CM Shinde Live: एकनाथ शिंदेंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

Nashik Live Updates: मनपा आयुक्तांच्या दालनातच शेतकरी आक्रमक

भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून महापालिका आयुक्तांच्या दालनात शेतकरी आक्रमक झाले. भाजपचे नेते उद्धव निमसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. महापालिकेने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने शेतकरी मनपा प्रशासनाविरोधात आक्रमक झाले.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून 17 ऑगस्टला राज्य सरकार भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे.

CM Shinde Live updates: एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर ST कर्मचाऱ्यांचा ९ ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवरपडला आहे. ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ST कर्मचारी संघटनांची मंत्रालयात चर्चा झाली आहे.

Vinesh Phogat Live Update:  केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया विनेश फोगट अपात्रतेवर काय म्हणाले?

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटातून अपात्र ठरवण्यात आल्यावर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, विनेश फोगटला जास्त वजन असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले. 50 किलो वजनाच्या विनेश फोगटचे वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचे आढळून आल्याने भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून, पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. सरकारने विनेश फोगटला तिच्या आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली आहे, तिच्यासाठी वैयक्तिक कर्मचाऱ्यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Nagpur Live Update: रुग्णालयांच्या खाटा कमी पडत आहेत, तुम्ही काय करताय? उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा

शहरातील डेंगू, मलेरिया आणि मुख्यतः चिकून गुनिया आजाराच्या उद्रेकाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली आहे. संपूर्ण शहर या आजारांनी ग्रासले असून रुग्णालयात खाटांची कमतरता पडत आहे. शहरात पाणी साचत असून अस्वच्छता, आरोग्याला पोषक लाभत नाही. त्यामुळे, या आजारांना रोखण्यासाठी महापालिकेने आजवर काय केले, याचे दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

CMO Cabinet Meeting Live Update: अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

Swapnil Kusale New Delhi Live Update: नेमबाजीत कांस्यपदक पटकावलेल्या स्वप्नील कुसाळेचं नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत

भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत इतिहास रचला. स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच खेळात 3 पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच, 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारतीयाने ऑलिम्पिक फायनल गाठली आणि पदक जिंकले. आज नवी दिल्लीत  स्वप्नील कुसाळेचं जल्लोषात स्वागत केलं आहे.

Maharashtra Live Update : माजी खासदार पुनम महाजन यांनी घेतली केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

लोकसभा निवडणूक पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्वल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून संधी देण्यात आली होती. या भेटीनंतर पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल.

Maharashtra Live Update : राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाबाजानी दुराणी यांची शरद पवार गटात घरवापसी

मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बाबाजानी दुराणी दाखल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घेणार भेट घेतली. दुराणी यांनी शरद पवार गटातून पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तैयारी दर्शवली आहे. तसेच शिंदे गटावर त्यांनी टीका केली आहे. शिंदे गट शून्य माणूस असून पैशाच्या जोरावर आले आल्याचा आरोप केला आहे.

Vinesh Phogat Live Update : अत्यंत कमी फरकाने विनेश अपात्र झाल्या हे खूप दुर्दैवी : खासदार हरभजन सिंग

अत्यंत कमी वजनाच्या फरकाने विनेश फोगाट यांना अपात्र ठरवण्यात आले हे खूप दुर्दैवी आहे. विनेश सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी जवळ होती. सगळ्यांना त्यांच्याकडून खूप आशा होत्या. जे घडले ते अतिशय निराशाजनक आहे,अशी प्रतिक्रिया 'आप'चे खासदार हरभजन सिंग यांनी व्यक्त केली.

Vinesh Phogat Live Update : विनेश फोगाट यांना अपात्र केल्यामुळे ऑलिम्पिक विजेत्यांच्या अभिनंदनाचा नियोजित कार्यक्रम स्थगित

आज ऑलिम्पिक विजेते खेळाडू मनू भाकर, स्वप्नील कुसळे पुन्हा मायदेशी परतले. दुपारी २:३० वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या निवासस्थानी सर्वांचे अभिनंदन आणि जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना अपात्र ठरवण्याच्या बातमीनंतर आता हा कार्यक्रम स्थगित केला गेला आहे.

Mantralay Live: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात तुडुंब गर्दी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात तुडुंब गर्दी झाली आहे. प्रवेश पत्रिका काढण्यासाठी तसेच मंत्रालयात प्रवेशासाठी लागल्या लांबच लांब रांगा. अभ्यगतांना मंत्रालयात प्रवेशासाठी तासंनतास रांगेत उभ राहण्याची पाळी आली असून त्यांना आवरण्यात पोलिसांना नाकीनऊ येत आहे. गर्दीचा मोबाईल नेटवर्कवर देखील परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे

Koyna Dam Live Update: सातारा कोयनासह सर्व प्रमुख धरणातून विसर्ग बंद   

 कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता चार फुटांवर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले. त्‍यामुळे सलग ११ दिवस कोयना धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद झाल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
धरणाचे सहा वक्र दरवाजे २५ जुलैला सायंकाळी पाच वाजता दीड फुटाने उघडण्यात आले व धरणाच्या सांडव्यावरून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने चार, सहा, आठ तसेच २ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता साडेदहा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात ५० हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, गेले तीन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने सोमवारी दुपारी बारा वाजता आठ फुटांवर, पाच वाजता सहा आणि रात्री आठ वाजता चार फुटांपर्यंत खाली आणले होते.

Vinesh Phogat Health Live Update: विनेश फोगटची प्रकृती बिघडली

Manoj Jarange Live:मनोज जरांगेच्या शांतता रॅलीचे जोरदार सोलापूरात स्वागत

सोलापूरत मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू झाली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीचे जोरदार स्वागत होत आहे

Kolhapur Live: कोल्हापूर महापालिकेच्या राजारामपुरीतील इमारतीत पाणी गळती

महापालिकेचे विभागीय कार्यालय तसेच नगररचना विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीला मोठी गळती लागली आहे. पाऊस पडल्यानंतर जिन्यातून पाणी वाहते. तसेच पश्‍चिमेकडील भिंतीतूनही पाणी पाझरते.
महापालिकेच्या राजारामपुरीतील इमारतीत विभागीय कार्यालय, नगररचना कार्यालय, नागरी सुविधा केंद्र, अन्य कार्यालये तसेच व्यावसायिकांचे गाळे आहेत. दुसऱ्या मजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या जिन्यातील भिंतीतून स्लॅबवरील पाणी पाझरते. जास्त पाऊस झाल्यानंतर ते जिन्यातून वाहत राहते. अशा जिन्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने धोकादायक बनले आहे.

Vinesh Phogat LIVE: "क्रीडामंत्री जवाब दो..."; विनेश फोगाट अपात्रतेवरुन लोकसभेत गदारोळ

विनेश फोगाट अपात्रतेवरुन लोकसभेत गदारोळ झाला. क्रीडा मंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Ramesh Kere Patil Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी- रमेश केरे पाटील

उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही प्रमुख नेत्यांना भेटलो. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळाव, याबाबत नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी भूमिका घेतली असती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी. यासाठीच आम्ही बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक झालो. या नेत्यांची खरा चेहरा लोकांच्या पुढे आणणार. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी जाणार… नाही तर ठिय्या करणार, असा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिला.

Paris Olympics: क्युबन कुस्तीपटूचा विक्रम, कुस्तीत मिळवले सलग पाचवे सुवर्ण पदक

क्युबन कुस्तीपटू मिजान लोपेझने सलग पाच ऑलिम्पिकमध्ये एकाच स्पर्धेत सलग पाच सुवर्णपदकं जिंकून रचला इतिहास. लोपेझने चिलीचा कुस्तीपटू यास्मिन अकोस्टा याला पराभूत करून हा विक्रम आपल्या नावावर केला.

Sunil Kedar Live: नागपूर जिल्हा बँक गैर व्यवहार प्रकरणी आमदार केदारांना 15 दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश

नागपूर जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार सुनील केदार यांना 15 दिवसांच्या आता लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Mumbai Goa Highway Live: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून, माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे.

Maharashtra Aid Kerala-Assam : आसाम आणि केरळ राज्याच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावला

आसाम आणि केरळ राज्याच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाल्याने दोन्ही राज्याला आर्थिक मदत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही राज्यांना प्रत्येकी १० कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून एकूण २० कोटी रुपये वर्ग करण्यात आलेत.

Ajit Pawar Live:: अजित पवार यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील भेटीदरम्यान विधानसभा जागा वाटप लवकरात लवकर व्हावं, यासाठी अमित शाह यांना विनंती केल्यानंतर त्यानंतरची ही दुसरी भेट आहे.

मंगळवारी झालेल्या भेटीत देखील जागा वाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार यांची चर्चा पार पडल्यानंतर आज रात्री उशीरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

Manu Bhaker Live: कांस्यपदक विजेती मनू भाकर भारतात दाखल, जंगी स्वागत 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक विजेती मनू भाकर ही भारतात दाखल झाली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. मनूने ऑलिम्पिकमध्ये २ पदकं जिंकण्याची किमया केली आहे.

MHADA Homes Live : मुंबईत म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटीत जोडप्यांना डिग्री प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक असणार आहे म्हाडाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे त्या दृष्टीने म्हाडााने आपल्या ॲप मध्ये तसेच संगणक प्रणालीमध्ये देखील आवश्यक ते बदल केले आहेत लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई आणि कोकण बोर्डाच्या सोडतीपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना पती-पत्नीच्या एकत्रित कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जातो काही अर्जदार दोन पैकी फक्त एकाचे उत्पन्न दाखवून घरासाठी स्वतंत्र अर्ज भरत असतात लॉटरीमध्ये घर जिंकल्यानंतर संयुक्त कुटुंबाचे उत्पन्न लपवण्यासाठी आम्ही वेगळे झालो आहोत कोर्टात केस आहे असे उत्तर देऊन म्हाडाची दिशाभूल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले यामुळे म्हाडाने डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे मुंबई मंडळाच्या गेल्या वर्षीच्या सोडतीत अशी 77 प्रकरणे म्हाडाच्या निदर्शनास आली होती अशा अर्जदारांवर म्हाडा कडून कारवाई देखील करण्यात आली आहे

CM Siddaramaiah LIVE : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात राज्यपालांकडे तक्रार दाखल

बंगळूर : म्हैसूर नगर विकास प्राधिकरणातील (मुडा) घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात राज्यपालांकडे आणखी एक तक्रार दाखल झाली. ‘मुडा’ घोटाळ्याच्या संदर्भात सिद्धरामय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आणखी एक तक्रार कागदपत्रांसह राज्यपालांकडे दाखल झाली.

Gruha Lakshmi Yojana : 'गृहलक्ष्मी'ची रक्कम आजपासून जमा होणार

बंगळूर : ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या (Gruha Lakshmi Yojana 2024) लाभार्थ्यांना आजपासून (ता. ६) रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले. ‘गृहलक्ष्मी’ योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबप्रमुख महिलांना दोन हजार रुपये देण्याची योजना आहे.

Bangalore Airport LIVE : बंगळूर विमानतळावर ६,६२६ सी-हॉर्स जप्त

बंगळूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तामिळनाडूतील तीन जणांना अटक करत त्यांच्याकडील ६,६२६ सी-हॉर्स (समुद्री घोडे) जप्त केले, अशी माहिती डीआरआय अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. यासह, डीआरआय बंगळूरच्या अधिकाऱ्याने दावा केला की, सुकवलेल्या समुद्री घोड्यांच्या अवैध व्यापारात गुंतलेले एक मोठे तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले गेले आहे.

Sofa Factory Fire LIVE : खराडी परिसरातील सोफा फॅक्टरीला भीषण आग

खराडी परिसरातील सोफा फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडलीये. सध्या आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुना जकात नाका परिसरात ही फॅक्टरी आहे.

Rajasthan Road Accident LIVE : राजस्थानमधील भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या चित्तोडगडमधील निंबाहेरा येथे भीषण रस्ता अपघात झाला. एकाच कुटुंबातील ५ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा झाला. निंबाहेरा चित्तोडगड चार लेनवर हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने दोन महिलांसह पाच जणांना चिरडले आहे. हे सर्व ६ जण एकाच बाईकवरून जात होते, असे सांगण्यात येत आहे.

Mumbai Mumbra LIVE : कुत्रा अंगावर पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मुंब्य्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्रा अंगावर पडल्याने एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. चिमुकली तिच्या घरच्यांसोबत रस्त्यांवरून जात होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर वरून कुत्रा पडला. यानंतर ती जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Uddhav Thackeray LIVE : शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

नवी दिल्ली : शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांची सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आहे. ठाकरे आज INDIA आघाडीत नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना आज समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षाचे नेते भेटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत.

Lal Krishna Advani LIVE : प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते अडवानी रुग्णालयात

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. ९६ वर्षीय अडवानी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. अडवानी यांना मागील महिन्यात एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mohammed Yunus LIVE : नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती

नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या प्रेस सचिवांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. संसद बरखास्त केल्यानंतर अध्यक्ष शहाबुद्दीन आणि विद्यार्थी नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते.

Pooja Khedkar Case LIVE : माजी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Latest Marathi Live Updates 7 August 2024 : बांगलादेशमध्ये आंदोलनानंतर पंतप्रधानांनाच राजीनामा देऊन परागंदा व्हावे लागल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना देशाचे अध्यक्ष महंमद शहाबुद्दीन यांनी संसद विसर्जित करण्याची घोषणा केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अपोलो रुग्णालयात हलविण्यात आलेय. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT