नोकरी लावण्यासाठी पैसे घेण्याचा प्रकार आपण यापूर्वी अनेक वेळा पाहिला असेल. मात्र, आता यासाठी थेट कन्सल्टन्सी स्टाफिंग कंपन्यांकडूनच पैसे घेतल्याची घटना आता समोर आली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये हा घोटाळा समोर आला आहे. (TCS Job Scam)
लाईव्ह मिंटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका व्हिसलब्लोअरने या घोटाळ्याचा खुलासा केल्याचं सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्याने थेट कंपनीचे मुक्य कार्यकारी अधिकारी (TCS CEO) आणि सीओओ यांना पत्र लिहित या घोटाळ्याची माहिती दिली. या पत्रामध्ये त्याने कंपनीच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती यांचं नावही घेतलं आहे.
काय आहेत आरोप?
व्हिसलब्लोअरने आपल्या पत्रात असे आरोप केले आहेत, की टीसीएसमध्ये नोकरी देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग कंपन्यांकडून कमिशन घेतलं होतं. यात ईएस चक्रवर्ती यांचं नाव समोर आलं आहे. या अधिकाऱ्यांनी कमीत कमी १०० कोटी रुपयांचं कमिशन घेतल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
कंपनीची कारवाई
या तक्रारीनंतर कंपनीने तातडीने याच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीमध्ये मुख्य सूचना सुरक्षा अदिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. काही आठवडे तपास केल्यानंतर या समितीने आपला रिपोर्ट सादर केला. यानंतर कंपनीने चक्रवर्ती यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. कंपनीने तीन स्टाफिंग फर्म्सना ब्लॅकलिस्ट देखील केलं आहे.
कोण आहेत अधिकारी?
ईएस चक्रवर्ती हे १९९७ पासून टीसीएसमध्ये काम करत आहेत. ते कंपनीचे सीओओ नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करत. त्यांच्यासोबत रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे एक्झ्युक्युटिव्ह अरुण जी.के. यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. अरुण यांचं थेट निलंबन करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई कऱण्यात आली त्यांची नावे समोर आलेली नाहीत.
किती मोठा आहे घोटाळा?
टीसीएसचं आरएमजी डिव्हिजन हे दररोज नवीन भरती करतं. यामध्ये सुमारे १,४०० इंजिनिअर्सना विविध प्रोजेक्टवर नेमण्यात येतं. म्हणजेच, टीसीएसचा हा विभाग प्रत्येक मिनिटाला एक नवीन प्लेसमेंट करतं. यातूनच लक्षात येतं की हा घोटाळा किती मोठा असू शकतो.
तीन वर्षात ३ लाख नोकऱ्या
टीसीएस ही भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी समजली जाते. २०२२ च्या शेवटी टीसीएसच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६.१५ लाख एवढी होती. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीने सुमारे ३ लाख नवीन पदांवर भरती केली आहे. यातील ५० हजारांहून अधिक पदं तर गेल्या काही महिन्यांतच भरली गेली आहेत. केवळ टीसीएसच नाही, तर इतर काही आयटी कंपन्या रेफरल प्रोग्राम किंवा स्टाफिंग फर्मच्या माध्यमातून भरती करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.