गीता गोपीनाथ esakal
देश

कोण आहेत भारताच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ, ज्यांना IMFने बढती दिली?

कोण आहेत भारताच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ, ज्यांना IMF ने बढती दिली?

सकाळ वृत्तसेवा

गीता गोपीनाथ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गीता गोपीनाथ या भारतीय (Indian) -अमेरिकन (American) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund - IMF) च्या मुख्य अर्थतज्ज्ञ (Economist) आहेत. पुढील महिन्यात गीता जेफ्री ओकामोटोची (Jeffrey Okamoto) जागा घेतील आणि पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक बनतील. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Crystalina Georgieva) यांच्यानंतर गीता गोपीनाथ यांचा क्रमांक लागतो. गीता गोपीनाथ आता आयएमएफध्ये क्रमांक दोनच्या अधिकारी असतील. गीता गोपीनाथ कोण आहेत आणि त्यांचा भारताशी काय संबंध आहे, ते जाणून घेऊया.

2018 मध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (Reserve Bank of India) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांच्यानंतर IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनलेल्या गीता दुसरी भारतीय बनल्या. यापूर्वी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या जॉन झ्वान्स्ट्रा प्रोफेसर म्हणून काम केले आहे. IMF च्या माजी व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लगार्ड यांनी गीता यांना जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ म्हटले आहे.

गीताने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स या दोन्हींमधून एमएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर 2001 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पीएचडी पूर्ण केल्यानंतर गीता शिकागो विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये सहाय्यक प्राध्यापक बनल्या. त्या 2005 मध्ये हार्वर्ड येथे आल्या आणि नंतर 2010 मध्ये आयव्ही-लीग इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर बनल्या.

गीताचा जन्म कोलकाता येथे झाला पण काही वर्षांनी त्यांचे कुटुंब म्हैसूरला गेले. गीताच्या वडिलांची इच्छा होती की, गीता यांनी इंजिनीअरिंग करावे किंवा वैद्यकीय क्षेत्रात जावे, पण गीताने अर्थशास्त्राचा मार्ग निवडला. 2001 मध्ये गीता यांना भारतात परतायचे होते पण त्यांच्या मेंटॉरनी त्यांची समजूत काढून थांबवले. तेव्हापासून गीता अमेरिकेत आहेत. कुटुंबामुळे त्यांचे भारतात येणे-जाणे सुरू असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT