Brij Bhushan on protest over new wrestling body chief Sakshee Malikkh bajarang puniya  
देश

आता फाशी घेऊ का? काँग्रेसच्या मांडीवर बसलेत म्हणत बृजभूषण यांची कडवट प्रतिक्रिया

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची नियुक्ती झालीये.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची नियुक्ती झालीये. त्यानंतर कुस्तीगीर साक्षी मलिक हिने पुन्हा कधीही कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतला. तर कुस्तीगीर बजरंग पुनिया याने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. यावरुन बृजभूषण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आंदोलन करणारे सर्व कुस्तीगीर हे काँग्रेसच्या बाजूचे आहेत. त्यांची लोकं आहेत. त्यांना कोणीही पाठिंबा देणार नाही. इतर कोणतेही कुस्तीगीर त्यांना पाठिंबा देत नाहीयेत. कारण ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ते विरोध करत आहेत म्हणून मी आता फाशी घेऊ का? अशी कडवट प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली. (Brij Bhushan on protest over new wrestling body chief Sakshee Malikkh bajarang puniya)

११ महिन्यांपासून निवडणुका प्रलंबित होत्या. निष्पक्ष निवडणुका पार पडल्या आणि त्यात संजय सिंह उर्फ बबलू या आमच्या बाजूच्या नेत्याची बहुमताने निवड झाली. विरोधी उमेदवाराचा ३३ मतांनी पराभव झाला. आम्ही खेळाच्या उन्नतीसाठी काम करणारे लोक आहोत, असं सिंह म्हणाले.

काही कुस्तीगीर अजूनही विरोध करत असतीलआणि साक्षी मलिकने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर मी काय करु शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना याचा अधिकार कोण देतं. ते आज निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली होती. बृजभूषण यांनी सात महिला कुस्तीगीरांसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पाच महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. सरकारने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कुस्तीगीरांनी घेतला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT