K. Kavitha sakal
देश

K. Kavitha : के. कविता यांच्या जामीन अर्जावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या ‘बीआरएस’च्या नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष न्यायालय तसेच दिल्ली उच्च न्यायालयात अनेकदा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या ‘बीआरएस’च्या नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष न्यायालय तसेच दिल्ली उच्च न्यायालयात अनेकदा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

भ्रष्टाचार आणि हवालाशी संबंधित कलमांन्वये के. कविता यांच्याविरोधात तपास संस्थांनी गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआय आणि ईडीकडून दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी कविता यांना जामीन देण्यास एक जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता. ‘‘मागील पाच महिन्यांपासून माझे अशील तुरुंगात बंद आहेत. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याने जामीन देण्यास काहीच हरकत नाही,’’ असा युक्तिवाद मागील सुनावणीवेळी कविता यांच्या वकिलांनी केला होता.

मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आपचे नेते मनीष सिसोदिया यांना दोन्ही तपास संस्थांशी संबंधित प्रकरणात जामीन मिळाला आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीशी संबंधित प्रकरणात जामीन मिळाला असल्याचा युक्तिवाद देखील कविता यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT