BSP Chief Mayawati esakal
देश

Mayawati : काँग्रेसला वाईट काळातच दलितांची का आठवण येते, हेच का त्यांचं खरं प्रेम? मायावतींचा थेट सवाल

'काँग्रेस पक्षानं डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा वारंवार अपमान केला आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'काँग्रेस पक्षानं डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा वारंवार अपमान केला आहे.'

Mayawati News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) वयाच्या 80 व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला आहे. मात्र, या निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.

मायावतींनी काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं त्यांनी 'बळीचा बकरा' असं वर्णन केलंय. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) सतत अपमान केल्याचा आरोपही मायावतींनी काँग्रेसवर केलाय. खर्गे यांनी बुधवारी तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा पराभव करून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "काँग्रेसचा इतिहास साक्षी आहे की, त्यांनी दीन-दलित, परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा वारंवार अपमान केलाय. या पक्षाला त्यांच्या चांगल्या दिवसात दलितांची कधीच आठवण होत नाही. मात्र, वाईट काळात काँग्रेसला दलितांची आठवण येते, असं त्यांनी म्हटलंय.

आणखी एका ट्विटमध्ये मायावतींनी काँग्रेसवर दलितांच्या भावनांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही केलाय. त्यांनी लिहिलंय, काँग्रेस पक्षाला आपल्या चांगल्या दिवसांच्या दीर्घकाळात बहुतांश गैर-दलितांची आठवण होते आणि सध्याच्या वाईट दिवसात दलितांची आठवण येत आहे. हे फसवं राजकारण नाही का? हेच काँग्रेसचं दलितांवरचं खरं प्रेम आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

कोण आहेत काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे?

मुळचे कर्नाटकातील असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचा राजकीय प्रवास अगदी कार्यकर्त्यापासून सुरू झाला. ते कर्नाटक विधानसभेत आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. खर्गे 9 वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार होते. खर्गे यांनी केंद्र सरकारमध्ये देखील मंत्रीपद भूषवलं आहे. दलित समाजातून येणारे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नेतृत्त्व पक्षाला पुनरुज्जीवन करण्यात यशस्वी होईल, अशी काँग्रेसला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT