J & K  Sakal
देश

Jammu Kashmir : काश्मीर खोऱ्यात सैन्याला मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार

या कारवाईदरम्यान सैन्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Budgam Encounter : मध्य काश्मीर खोऱ्यातील बडगममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. (Two Terrorist Killed In Jammu Kashmir Budguam District)

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

या कारवाईमध्ये भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय परिसराजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बडगाम जिल्हा न्यायालयाजवळ लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक विशेष इनपुट बॅरिकेड केले होते. यावेळी जवानांकडून एक संशयास्पद वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यावेळी वाहनातील दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरक्षा दलांनीदेखील प्रत्युत्तर केले त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईदरम्यान सैन्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

बडगाम चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावे अरबाज मीर आणि पुलवामा येथील शाहिद शेख अशी असून, या दोघांचा संबंध नुकत्याच धनगरी आणि राजौरी येथे झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाशी असल्याचे काश्मीचे ADGP यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT