संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या दरम्यान, 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आपले सातवे बजेट सादर करणार आहेत. सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून निर्मला सीतारामन आपल्या नावावर नवं रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आजही सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम देसाई यांच्या नावावर आहे. या अर्थसंकल्पानंतरही ते त्यांच्या नावावरच राहणार आहे.(Budget 2024 Nirmala Sitharaman will not be able to break that record of Morarji Desai this time )
निर्मला सीतारामन पुढील महिन्यात ६५ वर्षांच्या होणार आहेत. 2019 मध्ये त्यांना भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनवण्यात आले. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. तेव्हापासून सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
मोरारजी देसाईंचा तो विक्रम मोडायला सीतारामन यांना अजून वेळ लागेल
2024-25 या आर्थिक वर्षासाठी (एप्रिल, 2024 ते मार्च 2025) पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. त्यामुळं देशभरात अर्थसंकल्प सादर करण्यात निर्मला सीतारामन रेकॉर्ड करतील अशी चर्चा रंगली आहे. पण मोरारजी देसाई यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत.
देसाई यांनी 1959 ते 1964 दरम्यान सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जवाहरलाल नेहरू आणि नंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत.
याआधीही नेत्यांनी देसाईंचे रेकॉर्ड तोडण्याचा केला होता प्रयत्न
स्वतंत्र भारताचा पहिला सामान्य अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुखम चेट्टी यांनी सादर केला होता. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री असताना आठ अर्थसंकल्प सादर केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना 1991 ते 1995 दरम्यान सलग पाच अर्थसंकल्प सादर केले.
सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर
सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तास 40 मिनिटांचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. हिरुभाई मुलजीभाई पटेल यांचे 1977 मधील अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण हे आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण आहे, ज्यात फक्त 800 शब्द होते.
परंपरेने फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येत होते. पण कालांतराने यामध्ये बदल करण्यात आला.
1999 मध्ये वेळ बदलण्यात आली आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिंह यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जातो.
यानंतर, 2017 मध्ये, अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून 1 फेब्रुवारी करण्यात आली, जेणेकरून सरकार मार्च अखेरीस संसदीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.