Budhadev bhattacharya esakal
देश

Budhadev bhattacharya: लाल वादळ शांत झालं! माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन

West Bengal News: माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे सीओपीडी आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर कोलकाता येथे घरीच उपचार सुरु होते. आजारपणामुळे मागच्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

संतोष कानडे

West Bengal: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भट्टाचार्य हे 80 वर्षांचे होते.

बुद्धदेव भट्टाचार्य हे मागच्या बऱ्याच वर्षांपासून आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 8.20 वाजता भट्टाचार्य यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे सीओपीडी आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर कोलकाता येथे घरीच उपचार सुरु होते. आजारपणामुळे मागच्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

भट्टाचार्य हे २००० ते २०११ या कालावधीमध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव यांचा जन्म १ मार्च १९४४ रोजी उत्तर कोलकाता येथे झाला होता. पुढे त्यांनी माकपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कमान सांभाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT