नवी दिल्ली - बुंदेलखंड एक्स्प्रेस वे सुरू होऊन पाच दिवसही झाले नाही, तोच बोगस कामाची पोलखोल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जुलै रोजी जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले होते. बुंदेलखंड एक्स्प्रेस वे शक्तीशाली उत्तर प्रदेशचा पाया होईल, असं मोदींनी म्हटल होतं. मात्र मात्र थोड्याशा पावसानेच रस्ता खचल्याचं समोर आलं आहे. (Bundelkhand Expressway news in Marathi)
देशातील मोठमोठ्या अभियंत्यांनी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेची निर्मिती केली. पण पहिल्याच पावसाने बुंदेलखंड एक्स्प्रेस वेच्या कामाची पोलखोल केली आहे. रस्ता खचल्याचा व्हिडीओ समोर येताच, समाजवादी पक्षाने (एसपी) यावर जोरदार टीका केली आहे.
समाजवादी पक्षाने (एसपी) व्हिडिओ ट्विट करून म्हटले की, 'पावसाने अपूर्ण बुंदेलखंड एक्सप्रेसवेची पोलखोल केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बुंदेलखंड एक्स्प्रेस वे पावसात वाहून गेला. अपूर्ण एक्स्प्रेस वे बुंदेलखंडवासियांसाठी भेट असल्याचं सांगणारे भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सपाने म्हटलं आहे.
सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, 'भाजपच्या अर्धवट विकासाच्या गुणवत्तेचा बुंदेलखंड एक्सप्रेस वे नमुना आहे. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन मोठ्या लोकांकडून झाले आणि त्याच एक्सप्रेसवेमध्ये भ्रष्टाचाराचे मोठे खड्डे पडल्याची टीकाही अखिलेश यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.