Pune-Indore Bus Accident 
देश

Bus Accident : इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती जण होते याची ठोस माहिती अद्यपपर्यंत मिळू शकलेली नसून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Amalner-Indore Bus Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची बस क्र. MH40 N 9848 ही बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील बॅच क्रमांक 18603 आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी बॅच क्रमांक 8755 हे दोघे ही बस घेऊन इंदोरहून अमळनेरकडे घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही.

अपघातग्रस्त बसमध्ये महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नसून, एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एसटी बसचा अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT