PM Narendra Modi Sakal
देश

PM Narendra Modi : सणासुदीला ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात देशवासीयांनी ‘मेड इन इंडिया’ वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात बोलताना केले. कोणतेही सामान खरेदी करताना किंवा भेट वस्तू देताना ते ‘मेड इन इंडिया’ असेल, याची खात्री करा, असे मोदी म्हणाले.

‘‘मन की बात या कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. हा कार्यक्रम विजयादशमीच्या दिवशी सुरु झाला होता आणि दहा वर्षे ज्यादिवशी पूर्ण होतील, तो नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ चे अनेक टप्पे आपण विसरू शकत नाही,’’ असे मोदी म्हणाले. मोदी यांनी आजच्या कार्यक्रमात पुद्दुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अभियानाचे उदाहरण दिले.

‘‘दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाची दहा वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने काही ना काही कामे सुरू आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात झाला नावाचे गाव आहे. या गावातील लोक दिवसातील दोन तास स्वच्छतेची कामे करतात. असे कार्यक्रम अन्यत्र होणे आवश्यक आहे,’’ असेही मोदी यांनी सांगितले. 

प्राचीन कलाकृती मायदेशी परतल्या

अमेरिका दौऱ्यावेळी त्या देशाने तीनशेपेक्षा जास्त प्राचीन कलाकृती परत केल्या, असे सांगत मोदी म्हणाले, ‘‘अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी डेलावेअर येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी या प्राचीन वस्तू परत केल्या. टेराकोट स्टोन, हत्तीचे दात, लाकूड आणि तांब्यापासून बनवण्यात आलेल्या असंख्य मौल्यवान वस्तूंचा त्यात समावेश आहे. यातील काही वस्तू तर तब्बल चार हजार वर्षे जुन्या आहेत.’’

जगाची नजर भारतावर

‘‘युवा शक्तीमुळे जगाची नजर भारताकडे आहे. ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, हवाई वाहतूक, इलेक्ट्रॉनिक असो वा संरक्षण क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक वाढत आहे. जागतिक दर्जाच्या वस्तू बनवणे आणि स्थानिक वस्तूंचा वापर (वोकल फॉर लोकल) वाढेल, याकडे आता लक्ष देण्यात आले आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

Thane Fire News: ठाण्यात भीषण आग, आगीत दोन सिलिंडरचा स्फोट

Latest Marathi News Live Updates : ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

SCROLL FOR NEXT