Calcutta Metro sakal
देश

Calcutta Metro : कोलकता मेट्रोला आता ‘बॅटरी पॉवर’

मेट्रो सेवेला विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्यास अवघी यंत्रणाच कोलमडून पडण्याचा धोका असतो.

पीटीआय

कोलकता - मेट्रो सेवेला विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्यास अवघी यंत्रणाच कोलमडून पडण्याचा धोका असतो. आता अशा आपत्कालीन स्थितीमध्येही संबंधित मेट्रो गाडीचा ऊर्जा पुरवठा कायम ठेवून तिला नजीकच्या स्थानकावर पोचण्यास मदत करणारी बॅटरी प्रणाली ‘कोलकता मेट्रो’कडून विकसित करण्यात आली आहे. देशातील अशाप्रकारची ही पहिलीच प्रणाली असेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

येथील दक्षिणेश्वर ते न्यू गारिया कॉरिडॉर (ब्लू लाईन) या मार्गावर ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम’ (बीईएसएस) बसविण्यात येईल. हा मार्ग कोलकता शहराच्या दक्षिण आणि उत्तर या भागांना जोडतो. ही प्रणाली या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच ऊर्जेचा अधिक सुनियोजीतपणे वापर व्हावा या उद्देशाने या प्रणालीची निर्मिती करण्यात आल्याचे ‘मेट्रो’च्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

ऊर्जेचे असेही रूपांतर

कोलकत्यातील ब्लू लाईन हा देशातील सर्वांत पुरातन मेट्रो मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ही अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित होईल. या प्रणालीत इनव्हर्टर आणि ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरीचा (एसीसी) वापर करण्यात आला आहे.

‘एसीसी’ हे नव्या पिढीतील ऊर्जा संचयन तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. इलेक्ट्रो रासायनिक किंवा रासायनिक ऊर्जेचे पुन्हा इलेक्ट्रिक ऊर्जेत रूपांतर करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. इलेक्ट्रिक वाहतूक आणि बॅटरी स्टोरेजसाठीची इको सिस्टिम अधिक मजबूत करण्याचे काम यामुळे होणार आहे.

अनेक कंपन्या मैदानात

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रकल्पासाठी काम करण्याची तयारी दर्शविली होती. मागील महिन्यामध्ये एका तैवानी कंपनीच्या भारतीय उप कंपनीने याबाबतचे कंत्राट मिळविले होते. या प्रणालीमुळे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्यानंतर प्रवाशांनी भरलेली गाडी तीस किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने पुढील स्थानकापर्यंत खेचत नेली जाऊ शकते. ‘नॅशनल ग्रीड’ यंत्रणा कोलमडल्यानंतर देखील मेट्रो सेवा विनाव्यत्यय चालू शकते.

दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटऱ्या

नव्या प्रणालीत ग्रीन बॅटरीचा समावेश असेल. त्यांचा जीवनकाळ हा १४ वर्षांचा असतो. ही यंत्रणा बसविण्यासाठी १०६ चौरस फूट एवढ्या जागेची आवश्यकता असते. या प्रणालीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तर कमी होईलच पण त्याचबरोबर या बॅटऱ्यांचे आयुर्मान अधिक राहणार असल्याने प्रदूषणाला चाप बसेल. ॲसिडिक व अल्कलाईन बॅटऱ्यांमध्ये आगीचा धोका अधिक असतो पण या बॅटऱ्यांच्या बाबतीत तसे काही होण्याचा धोका कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT