West Bengal BJP nabanna abhiyan clashes between bjp workers police calcutta high court sought a report  
देश

High Court : "पतीला भित्रा, बेकार म्हणणं, पालकांपासून वेगळं होण्यास भाग पाडणं ही क्रूरता"

भारतीय संस्कृती आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे, असं सांगते, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

वैष्णवी कारंजकर

पत्नीने पतीला त्याच्या पालकांपासून वेगळे होण्यास भाग पाडल्यास आणि त्याला बेकार व भित्रा म्हटल्यास ही मानसिक क्रूरता मानून घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो, असा निकाल कलकत्ता न्यायालयाने नुकताच दिला आहे.

न्यायमूर्ती सौमेन सेन आणि उदय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितलं की, भारतीय कुटुंबातील मुलाने लग्नानंतरही आपल्या आईवडिलांसोबत राहणे ही एक सामान्य प्रथा आहे आणि जर त्याच्या पत्नीने त्याला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी काही न्याय्य कारण असायला हवं.

"भारतीय संस्कृती आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे, असं सांगते. जर एखाद्या पत्नीने मुलाला समाजाच्या प्रथांपासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, तर तिच्याकडे त्यासाठी काहीतरी न्याय्य कारण असले पाहिजे. पत्नीची इच्छा होती की पतीने आपल्या कुटुंबापासून विभक्त होणे ही योग्य प्रथा नाही," असे खंडपीठाने नमूद केले आहे.

या प्रकरणामध्ये पतीला विभक्त होण्यास सांगण्यासाठी पत्नीने क्षुल्लक घरगुती समस्या आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेशी संबंधित समस्या आणि अहंकारावरुन होणारे वाद अशी कारणं होती. पती केवळ त्याच्या शांत वैवाहिक जीवनासाठी त्याच्या पालकांच्या घरातून भाड्याच्या घरात गेला होता.

ही पत्नीची तिच्या पतीसोबत सासरपासून वेगळे राहण्याची इच्छा न्याय्य कारणांवर आधारित नाही, कारण ती क्रूरता आहे. सामान्यतः कोणताही पती पत्नीचं असं कृत्य सहन करत नाही आणि कोणताही मुलगा त्याचे पालक आणि इतर कुटुंबातील सदस्यांपासून विभक्त होऊ इच्छित नाही. पत्नीने पतीला कुटुंबापासून विभक्त होण्यास भाग पाडण्याचा सततचा प्रयत्न पतीसाठी त्रासदायक ठरेल, असं मत खंडपीठाने व्यक्त केलं आहे.

"पत्नीने तिच्या वैयक्तिक डायरीमध्ये लिहिलं होतं की 'मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्या भ्याडपणाचा मला तिरस्कार वाटतो' आणि त्याच्यासारख्या बेरोजगार व्यक्तीशी लग्न करण्यास तिची संमती नव्हती आणि तिला इतरत्र लग्न करायचं असल्याने हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला गेला.

हे लग्न ठरल्यानंतर पण तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने तिचे लग्न तिच्या सध्याच्या पतीशी लावलं'. यावरून असं दिसून येतं की, 'तिला दुसरीकडे लग्न करायचं आहे' असं तिनं सांगितल्यामुळे ती तिच्या लग्नावर खूश नव्हती. तरीही पतीने तिच्याशी जुळवून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला," असंही खंडपीठाने नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT