Traffic Police Rules eSakal
देश

Traffic Police Rules : ...तर द्यावा लागणार नाही ट्रॅफिक पोलिसांना दंड; जाणून घ्या तुमचे 10 अधिकार!

Citizen Rights : गाडीची चावी काढून घेणे, कागदपत्रं काढून घेणे याबाबतही काही विशिष्ट नियम आहेत.

Sudesh

रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर सर्व नियम पाळत असाल, तर ट्रॅफिक पोलिसांना घाबरण्याची काहीच गरज नाही. कित्येक वेळा नागरिकांचा असा गैरसमज असतो, की सर्व नियमांचं पालन करुनही वाहतूक पोलीस दंड आकारतील. मात्र, कोणत्या परिस्थितीमध्ये पोलिसांना दंड द्यावा लागत नाही, याबाबत स्पष्ट नियमावली उपलब्ध आहे.

रस्त्यावर गाडी चालवताना कोणताही ट्रॅफिक पोलीस अचानकपणे गाडी अडवून थेट तुमच्याकडून दंड घेऊ शकत नाही. किंवा, मग गाडीची चावी काढून घेणे, कागदपत्रं काढून घेणे याबाबतही काही विशिष्ट नियम आहेत. नागरिकांच्या हिताचे असणारे हे नियम सगळ्यांनाच माहिती हवेत.

युनिफॉर्म गरजेचा

  • तुमच्यावर कारवाई करणारा ट्रॅफिक पोलीस हा पूर्ण गणवेशात हवा. जर त्या पोलिसाने गणवेश घातला नसेल, तर तुम्ही त्याला ओळखपत्र मागू शकता. पोलिसाने जर 'आयडी कार्ड' दाखवलं नाही, तर आपली कागदपत्रं न दाखवण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

  • पोलिसांना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यासाठी तुम्ही डिजिलॉकरची मदतही घेऊ शकता. तसंच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना हँडओव्हर करण्याची गरज नसते.

पावती पुस्तक

पावती पुस्तकाबाबत काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

  • जर एखाद्या वाहतूक पोलिसाने तुम्हाला अडवले, तर दंड वसूल करण्यासाठी त्याच्याकडे पावती पुस्तक किंवा ई-चलन मशीन असणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे नसतील, तर तो तुमच्याकडून दंड घेऊ शकत नाही.

  • कोणताही दंड देताना त्याची पावती आठवणीनं घ्या. जर पोलिसाने पावती दिली नाही, तर तुम्हीदेखील दंडाची रक्कम देण्यास मनाई करू शकता.

  • तुमची कागदपत्रं जप्त करण्याचा निर्णय जर पोलिसाने घेतला, तर त्यासाठी देखील त्या पोलिसाकडून पावती घेणं आवश्यक आहे. पोलीस अशी पावती न देता डॉक्युमेंट जप्त करु शकत नाही.

वाहन जप्ती

  • तुमच्या परवानगीशिवाय कोणताही ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाची चावी घेऊ शकत नाही.

  • तुमचं वाहन चुकीच्या ठिकाणी असेल, आणि तुम्ही तुमच्या वाहनात बसला असाल तर पोलीस ते वाहन 'टो' करू शकत नाही.

अटक झाल्यास काय?

एखाद्या व्यक्तीला जर वाहतूक पोलिसांनी अटक केली, तर त्याला सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनला नेलं जातं. त्यानंतर २४ तासांच्या आत त्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर करणं आवश्यक असतं.

वाहतूक पोलिसांविरोधात तक्रार

  • वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालणं टाळायला हवं. ते फक्त त्यांचं काम करत आहेत, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडून नकळत एखादी चूक झाली असेल, तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्या.

  • पोलिसांकडून जर जबरदस्ती दंड घेणे, गाडीची चावी काढून घेणे किंवा अन्य चुकीचे प्रकार होत असतील. तर त्यांच्याविरोधात तुम्ही नजीकच्या पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT