captain amrinder singh
captain amrinder singh sakal
देश

अमरिंदर सिंग स्थापन करणार स्वतःचा पक्ष; भाजपशी करणार युती?

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंदीगड : काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्तीही झाली. त्यानंतर कॅप्टन भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आता ते स्वतः पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

ठुकराल यांनी अमरिंदर सिंग यांचा हवाला देत म्हटलं की, "पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरु होत आहे. पंजाबच्या जनतेच्या चांगल्या भविष्यासाठी तसेच गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांसह लवकरच मी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे.

"शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार असेल तर नव्या पक्षासह मी भाजपशी युती करेन तसेच सन २०२२ मधील विधानसभा निवडणुकीसाठी समाधानकारक जागा मिळवेन. त्याचबरोबर समविचारी पक्ष जसे अकाली गट, भिंडसा आणि ब्रह्मपुरा गटासोबत युतीचाही मी विचार करत आहे," असंही अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचं ठुकराल यांनी सांगितलं.

माझे लोक आणि माझ्या राज्याचं भविष्य सुरक्षित होईपर्यंत मी लढत राहणार आहे. पंजाबला राजकीय स्थिरता हवी असून अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण हवं आहे. मी माझ्या लोकांना वचन देतो की, सध्या धोक्यात आलेली पंजाबची शांतता आणि सुरक्षा दूर करण्यासाठी मी हवं ते करेन, असंही कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाल्याचं ट्विट ठुकराल यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'डक'वर आऊट होणाऱ्या पंतची लज्जास्पद कामगिरी! टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात नोंद झाली विकेट

Ind vs Sa T20 WC Final Live Score : अक्षरचा आत्मघात; धावबाद झाल्यानं हुकलं झुंजार अर्धशतक

Neerja Chaudhary : 'लोकसभा निवडणुकीद्वारे 10 वर्षांच्या निरंकुश सत्तेला लगाम'; असं का म्हणाल्या लेखिका नीरजा चौधरी?

IND vs SA Final: द. आफ्रिकेच्या महाराजचा भारताला दे धक्का! एकाच षटकात रोहित-पंतला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा Video

Akola ACB : बार NOC साठी सव्वा लाखाची डिमांड; पोलिस पाटील ACB च्या जाळ्यात, ग्रामसेविका फरार

SCROLL FOR NEXT