Punjab Politics Captain Amarinder Singh esakal
देश

पंजाबच्या राजकारणातून मोठी बातमी; कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबरला त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

पंजाबच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Punjab Politics : पंजाबच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) त्यांचा 'पंजाब लोक काँग्रेस' (Punjab Lok Congress) पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवसानंतर दोन दिवसांनी म्हणजे, 19 सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पंजाबचे 6 ते 7 माजी आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. कॅप्टनसोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रण इंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर आणि नातू निर्वाण सिंग यांचा समावेश आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी अजूनही काँग्रेस पक्षात

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रणीत कौर (Praneet Kaur) अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. त्या पंजाबमधील पटियालातील काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिध्दू यांच्याशी झालेल्या हाय-प्रोफाइल वादामुळं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात निवडणूक लढवली. या सर्व वादानंतरही कॅप्टनच्या पत्नीनं काँग्रेस पक्ष सोडला नाही. मात्र, त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी सातत्यानं होत आहे.

कॅप्टनच्या पक्षानं 37 जागांवर निवडणूक लढवली

पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टनच्या पंजाब लोक काँग्रेसनं 37 जागा लढवल्या, तर मित्रपक्ष भाजपनं 65 जागांवर नशीब आजमावलं. या विधानसभा निवडणुकीत कॅप्टनच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. स्वतः कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून मोठ्या फरकानं पराभूत झाले. पंजाब निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या. मात्र, निवडणुकीनंतर पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे नेते सातत्यानं भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता या नेत्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाचाही समावेश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT