Anshuman Singh : सियाचीन येथे सहकाऱ्यांचा जीव वाचवताना कॅप्टन अंशुमान सिंह शहीद झाले होते. त्यांचं साहस आणि शौर्य; यामुळे ५ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपतींनी त्यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करुन सन्मानित केलं. परंतु आता अंशुमानच्या आई-वडिलांना आणखी एका दुःखाला सामोरं जावं लागत आहे.
शहीद अंशुमान सिंह यांची पत्नी स्मृती यांनी अंशुमान यांचा फोटो अल्बम, कपडे आणि इतर आठवणींसह सरकारकडून दिलेलं कीर्तिचक्र आपल्या माहेरी नेलं, असा आरोप अंशुमानच्या आई-वडिलांचा आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या कागदपत्रांवरचा पत्ता बदलून गुरुदासपूर येथील पत्ता टाकला आहे, असाही आरोप आहे.
या प्रकरणी अद्याप स्मृती यांच्याकडून कुठलंही स्टेटमंट आलेलं नाही. शहीद अंशुमान यांचे वडील राम प्रताप सिंह यांनी 'आज तक'शी संवाद साधताना म्हटलं की, आम्ही आमच्या मुलाच्या इच्छेनुसार स्मृतीसोबत लग्न लावलं होतं. मोठ्या इच्छा-अपेक्षा ठेवून आम्ही हे लग्न लावलं होतं. लग्नानंतर स्मृती माझ्या मुलीसोबत नोएडा येथे बीडीएसचा अभ्यास करत होती.
राम प्रताप सिंह पुढे म्हणाले की, १९ जुलै २०२३ रोजी जेव्हा आमचा मुलगा शहीद झाला तेव्हा सून स्मृती आणि मुलगी नोएडा येथे होते. मीच दोघींना कॅबने लखनऊला बोलावलं होतं. तिथून आम्ही गोरखपूरला गेलो. तिथेच अंत्यसंस्कार झाले. परंतु तेराव्यानंतर लगेच स्मृतीने घरी जाण्यासाटी हट्ट धरला.
राम प्रताप सिंह म्हणाले, 'स्मृतीच्या वडिलांनी जेव्हा तिच्या आयुष्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मी म्हणालो, आता ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे आणि स्मृतीची इच्छा असेल तर आम्ही तिचं पुन्हा लग्न करू.. आमची मुलगी म्हणून तिला निरोप देऊ. परंतु तेराव्यानंतर ती माहेरी निघून गेली. तिने माझ्या मुलाचा कायमचा पत्ताही बदला, आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.