देश

Captain Brijesh Thapa : ''आर्मी डे'ला झाला होता जन्म अन् आर्मीसाठी दिलं समर्पण'', जाणून घ्या शहीद कॅप्टन बृजेश थापाची स्टोरी

India Army : बृजेश थापा यांनी आपली ट्रेनिंग संपल्यानंतर २०१९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. दोन वर्षांसाठी त्यांना 10 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात करण्यात आलेलं होतं. या धाडसी सेना अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर दार्जिलिंगमध्ये शोककळा पसरली.

संतोष कानडे

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधल्या डोडामध्ये शनिवारी रात्री घनदाट जंगलात अत्याधुनिक शस्त्रांसोबत आलेल्या दहशतवाद्यांसोबत भारतीय जवानांचा सामना झाला. या दुर्घटनेत चार जवान शहीद झाले आहे. यामध्ये एक २६ वर्षीय तरुण कॅप्टन शहीद झाले आहेत.

शहीद जवानांमध्ये कॅप्टन बृजेश थापा, नायक डी. राजेश, शिपाई बिजेंद्र आणि अजय यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवानही या चकमकीमध्ये शहीद झाला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी देशात आर्मी डे साजरे केला जातो, त्याच १५ जानेवारीच्या दिवशी बृजेश यांचा जन्म झाला होता.

२६ वर्षीच आर्मी ऑफिसर बृजेश थापा हे दार्जिलिंग येथील बडा गिंग बाजार येथील रहिवाशी होते. त्यांच्या तीन पिढ्यांनी सेनेमध्ये देशसेवा केलेली आहे. बृजेश यांचे वडील कर्नल रँकमधून निवृत्त झाले आहेत.

बृजेश थापा यांनी आपली ट्रेनिंग संपल्यानंतर २०१९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. दोन वर्षांसाठी त्यांना 10 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात करण्यात आलेलं होतं. या धाडसी आणि तरुण सेना अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर दार्जिलिंगमध्ये शोककळा पसरली.

कॅप्टन बृजेश थापा यांच्या आईने 'आज तक'शी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, १५ जानेवारी रोजी माझ्या मुलाचा जन्मदिवस होता. १५ जानेवारी रोजी सेना दिवस असतो. माझा मुलगा आर्मीची ड्युटी करत असताना देशासाठी समर्पित झाला. लष्करात असल्याचा त्याला गर्व होता. त्याच्या वडिलांनी त्याला आर्मीऐवजी नेव्हीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्याला लष्करातच जायचं होतं... त्याला लष्काराबद्दल प्रेम आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती.

आई निलिमा थापा यांनी मुलाच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, 'ब्रिजेश मार्चमध्ये घरी आला होता. आता जुलैमध्ये तो पुन्हा घरी येणार होता. तो नेहमी आनंदी रहायचा.. रविवारी त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं आणि देशसेवेसाठी माझ्या मुलाने जीव दिला.

बृजेश यांच्या आईने पुढे म्हटलं की, माझा मुलगा दहशतवादला कधीच घाबरत नव्हता, निधड्या छातीने त्याने प्रत्येक प्रसंगाचा सामना केला. तो मुलगा 26 वर्षांचा होता.. त्याला साधे जेवणच आवडायचं. पूर्वी तो हलवा खायचा.. पण नंतर म्हणाला की, मी लठ्ठ होईन. म्हणूनच त्याने मिठाई खाणे बंद केले. माझा मुलगा असला म्हणून काय झालं? कुणाला तरी सीमेवर जावंच लागेल, नाहीतर देशाच्या शत्रूंशी कोण लढणार? असा कणखर बाणा शहीद बृजेश यांच्या आईने दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT