Yeti Narasimhananda Saraswati esakal
देश

महात्मा गांधींवरील वादग्रस्त विधान भोवलं, यती नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

'एक कोटी हिंदूंच्या हत्येला महात्मा गांधी जबाबदार आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'एक कोटी हिंदूंच्या हत्येला महात्मा गांधी जबाबदार आहेत.'

गाझियाबाद : महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी गाझियाबादमधील दसना देवी मंदिराचे (Dasna Devi Temple) महंत यती नरसिंहानंद सरस्वती (Yeti Narasimhananda Saraswati) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाझियाबादच्या मसुरी पोलीस ठाण्यात (Mussoorie Police Station Ghaziabad) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. नरसिंहानंद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत.

यती नरसिंहानंद सरस्वती यांनी 13 जुलै रोजी महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 153A आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरनुसार, महंत यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते एक कोटी हिंदूंच्या (Hindu) हत्येला महात्मा गांधी जबाबदार असल्याचं सांगतात. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदूंच्या दुर्दशेसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरलंय.

एफआयआरनुसार, व्हिडिओमध्ये महंतांनी राष्ट्रपित्याबद्दल अनेक अपमानास्पद आणि अपशब्द वापरले आहेत. यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या वक्तव्यामुळं समाजातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT