CM Siddaramaiah esakal
देश

Caste Census Report : बिहारनंतर आता कर्नाटकात जातनिहाय जनगणना; 'या' महिन्यात मुख्यमंत्री करणार अहवाल सादर!

आमचा समाज जातिव्यवस्थेवर आधारित आहे. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता दिली पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या जातनिहाय जनगणनेला का विरोध करत आहेत.

बंगळूर : जातनिहाय जनगणना अहवाल (Caste Census Report) हा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे हे नोव्हेंबरमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी सांगितले.

म्हैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले, ‘‘आमचा समाज जातिव्यवस्थेवर आधारित आहे. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता दिली पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी हवी आहे. त्यासाठी आम्ही जातीनिहाय जनगणना केली होती. जातनिहाय जनगणना झाली, तेव्हा कांतराजू हे मागासवर्गीय आयोगाचे (Backward Classes Commission) अध्यक्ष होते.

कांतराजू अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वीकारला नाही. विद्यमान अध्यक्षांशी चर्चा केली आहे. ते नोव्हेंबरमध्ये अहवाल देणार आहेत. अहवाल सरकारच्या हाती आल्यानंतर निर्णय घेऊ. सरकारी योजना सर्वस्तरातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी जात आणि सामाजिक जनगणना आणि त्याची आकडेवारी आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या जातनिहाय जनगणनेला का विरोध करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. आरक्षण आणि इतर सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेली शास्त्रीय आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. केवळ सर्वेक्षणातील उपलब्ध डाटाच आरक्षणाच्या मॅट्रिक्समध्ये मागील भाजप सरकारने निर्माण केलेला गोंधळ दूर करू शकतो. अन्यथा, कोणालाही सामाजिक न्याय प्रदान केला जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

डाटा लीक झाला?

गेल्या वेळी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना सर्वेक्षण पूर्ण झाले असले तरी ते योग्य स्वरूपात सरकारला सादर केले गेले नाही. मात्र, जनगणनेतील डाटा लीक झाल्याचा दावा केला जात होता, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT